Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Seva Sankalp Campaign : शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन

Seva Sankalp Campaign : ठाणे येथे आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे अभियान केवळ महिनाभरापुरते मर्यादित न ठेवता निरंतर सुरू ठेवण्याचे आवाहन केले. शासनाच्या २६ विविध योजनांचा लाभ सुमारे दीड लाख पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 16, 2026 | 08:53 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • दीड लाख लाभार्थ्यांपर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट  
  • सेवा संकल्प अभियानाची प्रेरणा नरेंद्र मोदींच्या सेवाभावी कार्यातून मिळाली   
  • तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही सरकारचा भर  
Seva Sankalp Campaign: शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी राबविण्यात येणारे ‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ महिनाभरापुरते मर्यादित न राहता निरंतर सुरू राहिले पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 16 ऑक्टोबर रोजी सांगितले. नागरिकांना त्यांचा हक्क आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने संवेदनशीलतेने काम करण्याची गरज आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दीड लाख लाभार्थ्यांपर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट

या अभियानांतर्गत विविध विभागांच्या माध्यमातून २६ प्रकारच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांना देण्यात येत असून, सुमारे दीड लाख लाभार्थ्यांपर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा आदी विविध विभागांचा या अभियानात सहभाग आहे. विद्यार्थ्यांसाठी सायकली, शालेय साहित्य, संगणक, लॅपटॉप, वॉटरकूलर यांसह विविध स्वरूपातील मदतही या माध्यमातून केली जात आहे.

गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय विभागांनी या अभियानासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवता आला. या कामासाठी सर्व विभागांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवलीत युतीत बिघाडीचे संकेत? प्रभाग समिती सभापतीपदासाठी १८ उमेदवारांचे अर्ज 

सेवा संकल्प अभियानाची प्रेरणा नरेंद्र मोदींच्या सेवाभावी कार्यातून मिळाली

‘सरकार आपल्या दारी’च्या धर्तीवर सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ त्यांच्या दारापर्यंत मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिक एखादी तक्रार किंवा समस्या घेऊन शासकीय कार्यालयात आल्यानंतर त्याचे म्हणणे ऐकून घेणारा आणि समस्या समजून घेणारा अधिकारी त्याला भेटला पाहिजे. प्रत्येक काम शक्य होईलच असे नाही; मात्र नागरिकाला सन्मानाने वागणूक देणे आणि त्याची समस्या समजून घेणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सेवा संकल्प अभियानाची प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवाभावी कार्यातून मिळाली, असेही शिंदे यांनी सांगितले. मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अधोरेखित करत त्यांनी ‘राष्ट्र प्रथम’ या विचारातून देशाला विकासाच्या दिशेने नेण्याचे काम सुरू असल्याचे नमूद केले.

यावेळी राज्यातील शेतकरी संकटाचाही त्यांनी उल्लेख केला. अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असून, मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना तातडीची ५ हजारांची अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही सरकारचा भर

तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही सरकारचा भर असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कौशल्य विकास, स्टार्टअप आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

“पद, पैसा किंवा संपत्तीपेक्षा माणसं किती कमावली आणि त्यांचं प्रेम किती मिळवलं, हे अधिक महत्त्वाचं आहे,” असे सांगत प्रशासनाने सर्वसामान्यांशी आपुलकीने आणि संवेदनशीलतेने वागावे, असे आवाहन त्यांनी केले.

सेवा संकल्प अभियान हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नसून सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा सातत्यपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे अभियानाची व्याप्ती आणि लाभार्थ्यांची संख्या वाढवत ते निरंतर सुरू ठेवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने आणि जिल्ह्यातून आलेले लाभार्थी उपस्थित होते.

Bhiwandi Ramleela: रावणाच्या जुलूमशाहीचे थरारक सादरीकरण; रामलीलेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू

Web Title: Seva sankalp abhiyan eknath shinde thane government schemes sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • BJP-Shivsena
  • Dr Shrikant shinde
  • Naresh Mhaske
  • shivsena

संबंधित बातम्या

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
1

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज
2

Eknath Shinde : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; पक्षाकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या ‘या’ ८ मागण्या
3

Mira Bhayandar: मिरा रोड-भाईंदर रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा? खासदार नरेश म्हस्केंनी मांडल्या ‘या’ ८ मागण्या

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे
4

DCM Eknath Shinde : देवीच्या चरणी बळीराजासाठी साकडे; दुष्काळात सरकार खंबीरपणे पाठीशी – एकनाथ शिंदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.