Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Political : मिरा-भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्ते यांची नरेंद्र मेहता यांच्याशी अचानक भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गुणरत्न सदावर्ते यांनी मिरा-भाईंदर येथे नरेंद्र मेहता यांची घेतलेली अचानक भेट चर्चेचा विषय ठरली आहे. रिक्षा-टॅक्सी धोरणावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 23, 2026 | 04:54 PM
मिरा-भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्ते यांची नरेंद्र मेहता यांच्याशी अचानक भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मिरा-भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्ते यांची नरेंद्र मेहता यांच्याशी अचानक भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Follow Us
Follow Us:

मिरा-भाईंदर : ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आज मिरा-भाईंदर येथील भाजप कार्यालयात येऊन भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात १ तारखेपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी संबंधित धोरणांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. मराठी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुद्द्यावरून सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, या विरोधात त्यांनी मोर्चाचे नेतृत्वही केले आहे. विशेष म्हणजे, सदावर्ते यांनी वारंवार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. मेहता आणि सदावर्ते यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी, रिक्षा-टॅक्सी धोरण, स्थानिक प्रश्न आणि आगामी राजकीय समीकरणांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या भेटीमुळे मिरा-भाईंदर परिसरात राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत असून, येत्या काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maval News : सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अन् शासकीय कार्यालयाला टाळं; मावळात कामकाज ठप्प

भाईंदरमध्ये सदावर्ते यांच्या बैठकीला मनसेचा जोरदार विरोध

भाई्दर पूर्वेच्या ऑटो रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीदरम्यान आज वातावरण तणावपूर्ण झाले. डॉ. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत असताना मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोध दर्शविला. ज्योती पार्क, इंद्रलोक कॉर्नर जवळ, न्यू गोल्डन नेस्ट येथे आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले आणि सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करत वातावरण तापवले.

स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलक मनसे सैनिकांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली. दरम्यान, या बैठकीत ऑटो रिक्षा चालकांच्या विविध समस्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या घटनेमुळे भाईंदर परिसरात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

Web Title: Gunratna sadavarte meet narendra mehta mira bhayandar political discussion news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Gunratna Sadavarte
  • mira bhayandar
  • Narendra Mehta

संबंधित बातम्या

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले
1

Aaditya Thackeray : ‘दुसऱ्यावर धर्म लादणं ही हिंसाच!’ मिरा-भाईंदरच्या शाळेत कांदा-लसूण बंदी; आदित्य ठाकरे संतापले

Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक
2

Mira Bhayandar News: पर्युषणात कांदा-लसूण खाऊ नका! शाळेच्या व्हॉट्सॲप मेसेजवरून वाद; मनसे आक्रमक

MBMC Schools: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर
3

MBMC Schools: शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शाळांची धक्कादायक आकडेवारी, 9,613 वरून विद्यार्थी संख्या थेट 5,042 वर

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
4

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.