निळजे पुलाचे काम पूर्ण होऊ शकते तर पलावा पूलाचे का नाही ? मनसेच्या माजी आमदारांचा उपमुख्यमंत्री आणि खासदारांना केले टिकेचे लक्ष्य
कल्याण-कल्याण शीळ मार्गावरील निळजे येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले. पूल रहदारीसाठी खुला देखील करण्यात आला आहे. त्याबद्दल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी अभिनंदन केले आहे. मात्र नव्याने बांधण्यात येत असलेल्या पलावा उड्डाणपूलाचे काम का नाही होत असा सवाल उपस्थित करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना टिकेचे लक्ष्य केले आहे.
टाटा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने पलावा नजीक असलेल्या निळजे पूलाचे काम डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामधील रस्ता कटींग करुन रेल्वे ट्रॅकचे काम पूर्ण केले. पूलाचे काम पूर्ण करण्यासाठी या पूलावर पाच दिवसाकरीता वाहतूक बंद ठेवली होती. पूलाचे काम पूर्ण होताच पूलावरी रहदारी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. अत्यंत काटेकोरपणे कामाचे नियोजन केले. वाहतूक विभागानेही चांगले काम केले. यासाठी ज्यांचे योगदान लाभले. त्यांचे अभिनंदन माजी आमदार पाटील यांनी केले आहे. हे काम नियोजीत वेळेत होऊ शकते तर पलावा पूलाचे काम का होऊ शकत नाही असा सवाल माजी आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे. पलावा पूलाचे काम 2018 मध्ये सुरु करण्यात आले. ते अजून पूर्ण होत नाही.
एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएची तिजोरी कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या तिजोरीसारखी रिकामी झाली आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले द्यायला पैसे नाहीत अशी चर्चा सुरु आहे. दुसरीकडे अशी कामं टाटा आणि एल अँड टी सारख्या कंपन्यांना न देता आपल्याच मेहूण्या-पाहुण्यांच्या शेल कंपन्यांना दिल्याने ठेकेदारावर कोणाचा दबाव नाही, हे देखील बोलले जात आहे. खरं खोटं त्या ठेकेदाराच्या नाथांचा नाथ एकनाथालाच माहित अशी टिका माजी आमदार पाटील यांनी केली आहे.
टाटा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कडून पलावा येथील निळजे पुलाचे Dedicated Freight Corridor Project मधील रस्ता कटींग करून दुहेरी रेल्वे ट्रेकचे काम आज पुर्ण झाले व हा पुल रहदारीसाठी पुन्हा सुरू ही झाला. अत्यंत काटेकोर व पद्धतशीर पणे केलेले कामाचे नियोजन व तेवढ्याच चांगल्या… pic.twitter.com/zavs9iLFZz
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) February 10, 2025
राजू पाटील म्हणाले की, टाटा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कडून पलावा येथील निळजे पुलाचे Dedicated Freight Corridor Project मधील रस्ता कटींग करून दुहेरी रेल्वे ट्रेकचे काम आज पुर्ण झाले. हा पुल रहदारीसाठी पुन्हा सुरू ही झाला. अत्यंत काटेकोर व पद्धतशीर पणे केलेले कामाचे नियोजन व तेवढ्याच चांगल्या पद्धतीने वाहतुक पोलिस विभागाने दिलेल्या योगदानाचे हे फलित आहे. याकामी ज्यांचे ज्यांचे योगदान लाभले आहे त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन व आभार !
खरोखर जर चालू रस्त्यावर येवढे मोठे काम नियोजित वेळेत होऊ शकतो तर आमचे नव्याने बांधण्यात येणारे दोन्ही पलावा पुल, ज्यांचे काम २०१८ ला सुरू झाले आहे ते अजून पुर्ण का होत नाही ? एकीकडे MSRDC व MMRDA ची तिजोरी आमच्या ठाणे व कल्याण-डोंबिवली महानगरपालिकां सारखीच रिकामी झाली आहे व त्यामुळेच ठेकेदारांचे बिल द्यायला पैसे नाहीत ही चर्चा सुरू आहे तर दुसरी कडे अशी कामं टाटा किंवा L & T सारख्या कंपन्यांना न देता आपल्याच मेहुण्यांच्या-पाहुण्यांच्या shell कंपन्यांना दिल्याने ठेकेदारांवर कोणाचाही दबाव नाही हे देखील बोलले जात आहे….खरं खोटं त्या ठेकेदारांच्या नाथांचा नाथ ‘एक’ नाथा ‘लाच’ माहित अशी कडव्या शब्दांत राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.