वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या तिघांना अटक, 9 महिलांची पोलिसांनी केली सुटका
दिवसेंदिवस कल्याण परिसरातातील गुन्हे वाढत जात असल्याची घटना घडत आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण स्टेशन परिसरात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या तिघांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोन महिला असून एक पुरुष आहे. अटक आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना 13मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वेश्या व्यवसायातून9 महिलांची सुटका करण्यात आली आहे. या 9 महिलांना उल्हासनगरातील शांतीसदन या महिला वस्तीगृहात ठेवण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तौफीक हिमायद सैय्यद उर्फ टोप्या, सुमय्या अब्दुल रेहमान शेख, रिहना ख्वाजा शेख अशी आहेत. यापैकी तौफीक हा उल्हासनगरचा रहिवासी आहे. तर सुमय्या ही कल्याणच्या नांदिवली परिसरात राहते. रिहाना ही अंबरनाथच्या झाेपडपट्टीत राहते. स्टेशन परिसरात नव्या एसटी डेपोच्या इमारतीचे काम सुरु आहे. या ठिकाणी 3 आरोपी हे 9 महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळताच त्यांनी त्याठिकाणी छापा टाकला. महात्मा फुले पोलिसानी पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वार साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भितीचं वातावरण देखील निर्माण झाले आहे.