Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?

Kalyan News: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील फुटपाथवर भंगाराच्या वस्तू, हॉटेलच्या शेगड्या आणि इतर साहित्य ठेवून अतिक्रमण करण्यात आल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यापूर्वी अतिक्रमणविरोधी कारवाई होऊनही पुन्हा अतिक्रमणे होत असल्याने केडीएमसी प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 24, 2026 | 04:01 PM
फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! कल्याण स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?

फुटपाथवर भंगार, हॉटेलच्या शेगड्या; कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण! कल्याण स्टेशन परिसरातील फुटपाथ नेमका नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी?

Follow Us
Follow Us:
  • कल्याण स्टेशनसमोरील फुटपाथवर अतिक्रमणाचा विळखा
  • महापालिका प्रशासन करते तरी काय?
  • कल्याण स्टेशनबाहेर पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ
Kalyan News: कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानकासमोरील महापालिकेच्या फुटपाथवर पुन्हा एकदा अतिक्रमणाचा विळखा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फुटपाथवर अनधिकृतपणे भंगाराच्या वस्तू ठेवण्यात आल्या असून काही हॉटेल व्यावसायिकांनी चक्क शेगड्या आणि इतर साहित्यही मांडले आहे. त्यामुळे नागरिक आणि रेल्वे प्रवाशांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याने त्यांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. या परिस्थितीमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन नेमके करते तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (Kalyan News)

हजारो प्रवाशांची वर्दळ, पण फुटपाथ अतिक्रमित

कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचे आणि गर्दीचे स्थानक आहे. दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. सकाळी आणि सायंकाळी स्टेशन परिसरात मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत प्रवाशांसाठी फुटपाथ मोकळा असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात स्टेशनसमोरील फुटपाथवर विविध प्रकारचे साहित्य ठेवण्यात आले आहे. काही ठिकाणी भंगाराच्या वस्तूंचे ढीग दिसत आहेत, तर हॉटेल व्यावसायिकांकडून शेगड्या व इतर साहित्य फुटपाथवर ठेवले जात आहे. परिणामी पादचाऱ्यांचा मार्ग अरुंद झाला असून अनेकांना थेट रस्त्यावरून चालावे लागत आहे.

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश

अपघाताचा धोका, वाहतूक कोंडीत भर

स्टेशन परिसरात आधीच रिक्षा, बस आणि खासगी वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यात फुटपाथ अतिक्रमित झाल्यामुळे पादचारीही रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीचा ताण आणखी वाढत आहे. गर्दीच्या वेळेत या परिस्थितीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. स्टेशन परिसरातील विविध कामे आणि रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे प्रवाशांना आधीच समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप होत असताना आता फुटपाथवरील अतिक्रमणाने त्यात आणखी भर पडली आहे.

कारवाई होते, मग पुन्हा अतिक्रमण कसे?

विशेष म्हणजे, फुटपाथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी केडीएमसीकडून यापूर्वीही कारवाया करण्यात आल्या आहेत. मे २०२६ मध्ये कल्याण रेल्वे स्थानक, स्कायवॉक आणि बाजार परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. जून महिन्यातही महापालिकेने विविध भागांत कारवाई करत २७ हातगाड्या, अनधिकृत शेड आणि इतर अतिक्रमणे हटविल्याचे समोर आले होते. मात्र कारवाई झाल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा त्याच भागात अतिक्रमण होत असेल, तर या कारवाईचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ तात्पुरती कारवाई न करता संबंधित ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.

अतिक्रमण करणाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद?

महापालिकेची कारवाई झाल्यानंतरही पुन्हा फुटपाथवर व्यवसाय आणि साहित्य मांडण्याचे धाडस कसे केले जाते? अतिक्रमण करणाऱ्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? संबंधित अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष का करत आहेत? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. कल्याण-डोंबिवलीतील फुटपाथवरील अतिक्रमणाचा मुद्दा यापूर्वीही अनेकदा चर्चेत आला आहे. जुलै २०२६ मध्ये करण्यात आलेल्या पाहणीतही कल्याण पश्चिमेतील अनेक फुटपाथ अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांसाठी अपुरे ठरत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे सध्याच्या चित्रावरून दिसत आहे.

फुटपाथ नागरिकांसाठी मोकळा करा

फुटपाथ हा पादचाऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी असताना त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. विशेषतः रेल्वे स्थानकासारख्या अतिगर्दीच्या परिसरात फुटपाथ अतिक्रमित राहणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कल्याण स्टेशनसमोरील फुटपाथवरील अतिक्रमण तातडीने हटवून तो पूर्णपणे पादचाऱ्यांसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर एकदा कारवाई केल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नियमित पाहणी आणि कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

आता फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर महापालिका प्रशासन कारवाई करणार का? आणि कल्याण स्टेशन परिसरातील पादचाऱ्यांना त्यांचा हक्काचा फुटपाथ कधी मिळणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब

Web Title: Kalyan station footpath encroachment kdmc administration under question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC
  • railway

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश
2

KDMC News: १२ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! २७ गावांतील ५०० कर्मचाऱ्यांचा केडीएमसी सेवेत समावेश

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब
3

KDMC स्थायी समितीच्या सभेला अधिकारी गायब! सभापती-सदस्यांना जुमानत नाहीत का? अखेर सभा काही काळासाठी तहकूब

गटई कामगारांवर कारवाईची नोटीस अन् बड्या अनधिकृत बांधकामांवर प्रश्नचिन्ह; महिला मंडळाचा हल्लाबोल
4

गटई कामगारांवर कारवाईची नोटीस अन् बड्या अनधिकृत बांधकामांवर प्रश्नचिन्ह; महिला मंडळाचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.