Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट मात्र निगेटिव्ह

KDMC News: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या कथित प्रेग्नन्सी रिपोर्टवरून वाद निर्माण झाला आहे. हिमोग्लोबिन कमी असल्याने उपचारासाठी दाखल झालेल्या मुलीची रुग्णालयात तीन वेळा गर्भधारणा चाचणी करण्यात आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 11, 2026 | 03:06 PM
शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट निगेटिव्ह

शास्त्रीनगर रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह, बाहेरील टेस्ट निगेटिव्ह

Follow Us
Follow Us:
  • हिमोग्लोबिन कमी असल्याने रुग्णालयात दाखल
  • तीन चाचण्या आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा दावा
  • बाहेरील टेस्ट निगेटिव्ह, भाजप नगरसेवकाकडून चौकशीची मागणी
KDMC News Marathi: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणी अहवालावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हिमोग्लोबिन कमी असल्याने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिच्या गर्भधारणेच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा दावा करण्यात आला आहे.

तीन वेळा प्रेग्नन्सी टेस्ट केल्याचा कुटुंबीयांचा दावा

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात मुलीची एक-दोन नव्हे तर तीन वेळा गर्भधारणा चाचणी करण्यात आली. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याचा दावा आहे. याशिवाय कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये करण्यात आलेल्या तपासणीचा अहवालही पॉझिटिव्ह असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सोनोग्राफी अहवालही पॉझिटिव्ह असल्याचा दावा करण्यात आला आहे.

KDMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत सत्तावाटप निश्चित! महापौरपद शिंदे सेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपला; मनसेचा मोठा पाठिंबा

बाहेरील टेस्टमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह

रुग्णालयातील अहवालावर कुटुंबीयांना विश्वास न बसल्याने मुलीच्या वडिलांनी बाहेरून प्रेग्नन्सी टेस्ट किट आणून तपासणी केली. या चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. यानंतर कुटुंबीयांनी पुन्हा संबंधित निदान केंद्राशी संपर्क साधला. या संपूर्ण प्रकारामुळे रुग्णालयातील तपासणी आणि बाहेरील चाचणीच्या निकालांमध्ये कथित तफावत असल्याचा मुद्दा समोर आला आहे.

अल्पवयीन मुलीवर मानसिक परिणाम

या प्रकारामुळे संबंधित मुलीला मोठा मानसिक धक्का बसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. जवळपास २४ तास ती मानसिक तणावाखाली होती, असा दावा करण्यात आला आहे. ‘मी काही केलेले नसताना माझ्यासोबत असा रिपोर्ट का आला?’ असा सवाल करत ती रडत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचा खुलासा

भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल, सोनोग्राफी आणि प्रयोगशाळेतील प्रक्रिया यांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चौकशीची मागणी

या प्रकरणात नेमका अहवाल कसा तयार झाला, विविध चाचण्यांचे निकाल वेगवेगळे का आले आणि सोनोग्राफीच्या अहवालात नेमके काय नमूद करण्यात आले होते, याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

केडीएमसीच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची चौकशी केल्यास चाचणी प्रक्रिया, नमुना तपासणी, प्रयोगशाळेचे अहवाल आणि संबंधित वैद्यकीय नोंदी यांची पडताळणी होणे अपेक्षित आहे.

आयुक्तांकडून काय भूमिका घेतली जाणार?

या कथित प्रकारामुळे केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, शास्त्रीनगर रुग्णालय प्रशासन आणि संबंधित निदान केंद्र या प्रकरणावर काय स्पष्टीकरण देतात, याकडे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”

Web Title: Kdmc shastri nagar hospital minor girl pregnancy test report discrepancy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Hospital
  • kalyan
  • KDMC

संबंधित बातम्या

Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल आता परदेशात! कझाकस्तानमध्ये सुरू करणार रुग्णसेवा; काय आहे प्लॅनिंग?
1

Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल आता परदेशात! कझाकस्तानमध्ये सुरू करणार रुग्णसेवा; काय आहे प्लॅनिंग?

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे
2

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

Solapur News: अचानक हृदयाची धडधड थांबली! सीपीआरमुळे ५५ वर्षीय रुग्णाला मिळाले नवे जीवन
3

Solapur News: अचानक हृदयाची धडधड थांबली! सीपीआरमुळे ५५ वर्षीय रुग्णाला मिळाले नवे जीवन

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा
4

Kalyan Stray Dog: कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्‍यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.