कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप (Photo Credit- X)
राज्यातील सध्याच्या फोडाफोडीच्या आणि ‘खोक्यांच्या’ राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जे सुरू आहे, ते पाहून मन विषण्ण होते. मुंबईसह कल्याण-डोंबिवली आणि इतर ठिकाणचा हा राजकीय बाजार पाहून मला अक्षरशः शिसारी आली आहे. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला मनापासून वाटतंय की बाळासाहेब आज आपल्यात नाहीत तेच बरं झालं. जर ते आज असते आणि त्यांनी हे सगळं पाहिलं असतं, तर ते किती व्यथित झाले असते?”
बाळासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना राज ठाकरेंनी त्यांच्यातील कलावंताच्या आठवणींना उजाळा दिला. “बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट किंवा राजकारणी म्हणून आपण ओळखतोच, पण त्यापलीकडे ते एक महान व्यंगचित्रकार होते. बाहेर जगात कितीही मोठी राजकीय उलथापालथ झाली किंवा संकटे आली, तरी बाळासाहेब जेव्हा व्यंगचित्र रेखाटायला बसायचे, तेव्हा त्यांच्या मनातली शांती ढळत नसे. त्या बाह्य परिस्थितीचा परिणाम त्यांच्या व्यंगचित्राच्या एकाही रेषेवर कधीच उमटला नाही,” असे राज यांनी नमूद केले.
Maharashtra Politics: “… आज बाळासाहेब नाहीयेत ते बरंय”; मनसे अध्यक्ष राज ठाकरे कडाडले
कार्यक्रमात १९७३ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रंजक इतिहासही चर्चिला गेला. त्यावेळी काँग्रेसकडे बहुमत असतानाही बाळासाहेबांनी शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी मुस्लिम लीग आणि इतर छोट्या पक्षांशी युती केली होती. या ऐतिहासिक निर्णयावर राज ठाकरे म्हणाले की, “त्यावेळी विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. पण बाळासाहेबांनी ठणकावून सांगितले होते की, काँग्रेस नावाच्या सापाला ठेचण्यासाठी आम्ही मुस्लिम लीग नावाच्या नागाचा वापर करत आहोत.” हा किस्सा सांगून त्यांनी बाळासाहेबांच्या रोखठोक राजकारणाची आठवण करून दिली.
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे आणि संजय राऊत यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. राज ठाकरे यांनी ‘सामना’ वृत्तपत्रात बाळासाहेबांवर लिहिलेल्या लेखाचाही उल्लेख केला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अवघे ठाकरे कुटुंब आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
KDMC Politics: आकडे बोलतात! केडीएमसीत खरा बॉस भाजपाच, स्ट्राईक रेटमध्ये सर्वात सरस






