
व्हॉट्सअॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही... कोपरखैरणेत मोठा राडा! (photo Credit- X)
निवडणूक प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी ‘अण्णामलाई’ आणि मुंबईच्या भविष्याबाबत भाष्य करत जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, जाहीर झालेल्या निकालात मनसेला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. या निकालाचा संदर्भ देत कोपरखैरणे येथील एका तरुणाने आपल्या सोसायटीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानजनक मेसेज पोस्ट केला होता.
BMC निकालानंतर ‘रसमलाई’वरून राज ठाकरेंवर टीका! भाजप खासदाराचे ‘ते’ ट्विट व्हायरल…
हा मेसेज स्थानिक मनसैनिकांपर्यंत पोहोचताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. संबंधित तरुणाला शोधून काढत मनसैनिकांनी त्याला गाठले आणि राज ठाकरेंबद्दल चुकीचे शब्द वापरल्याबद्दल त्याला ‘मनसे स्टाईल’ चोप दिला. नेत्यांबद्दल बोलताना मर्यादा राखा, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करत मारहाण होत असलेल्या तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि ताब्यात घेतले. तसेच, कायदा हातात घेणाऱ्या मनसैनिकांनाही पोलिसांनी समज दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.