उद्धव ठाकरेंच्या नेत्याने एकनाथ शिंदेंना विचारले 'हे' 7 धडकी भरवणारे प्रश्न
तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आपले बालेकिल्ले टिकवून ठेवत भाजप–शिवसेना महायुतीला चांगलीच टक्कर दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेने ७१ जागांवर यश मिळवले. मात्र भाजप–शिवसेना महायुतीने एकूण ११८ जागा जिंकत स्पष्ट बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. यात सर्वाधिक ८९ जागा भाजपने जिंकल्या असून, मुंबईला भाजपचा पहिला मराठी महापौर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपची निर्णायक बाजी आणि त्यांना मिळालेली शिवसेनेची साथ यामुळे गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेवर असलेली ठाकरे यांची सत्ता संपुष्टात आली आहे. परिणामी, ठाकरे गटाला आता विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका करत त्यांना काही प्रश्न विचारले आहे. ट्विटरवर त्यांनी एकनाथ शिंदेंना टॅग करत ७ घणाघाती प्रश्न विचारले आहे.
अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एकनाथ शिंदेंना ७ प्रश्न विचारले आहे. हे प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत.
काय मिळवलंत ? @mieknathshinde
♦️ स्वतःला शिवसेना आणि स्व. बाळासाहेबांचे पाईक म्हणवणाऱ्यांनो काय मिळवलंत ?
♦️ ज्या मुंबईत स्व. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापिली तिथून शिवसेना हद्दपार करण्याच्या कटाचे भागीदार होऊन काय मिळवलंत ?
♦️ “मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे!” ह्या स्व.… pic.twitter.com/GCPSazV3oK— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 16, 2026
तुमच्याकडे एकंच उत्तर असेल कि, ‘आलिशान आयुष्य मिळवलं’ पण उद्या जेव्हा मराठी माणसाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मिंद्यांनो तुम्ही मुंबईतून शिवसेना संपवायच्या कटात सामील होतात ह्याची इतिहास नोंद घेईलच… आणि हा ठपका घेऊनच तुमचे वारसदार जगतील हे लक्षात ठेवा !






