Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माघी गणेशोत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा; विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मंडळाचे 31 वे वर्ष

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने गेल्या 30 वर्षांपासून हा माघी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या स्वरूपात तो साजरा करण्यात येणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 31, 2025 | 04:37 PM
माघी गणेशोत्सवात साकारला तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा; आमदार भोईर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे 31 वे वर्ष

माघी गणेशोत्सवात साकारला तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा; आमदार भोईर यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे 31 वे वर्ष

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण पश्चिमेतील सर्वात जुना सार्वजनिक माघी गणेशोत्सव अशी ओळख असलेल्या उंबर्डे येथील शिवप्रेमी माघी गणेशोत्सवामध्ये यंदा दक्षिणेतील श्री तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने गेल्या 30 वर्षांपासून हा माघी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या स्वरूपात तो साजरा करण्यात येणार आहे.

दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमूख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या उंबर्डे कोळिवली उपविभागीय शाखेतर्फे गेल्या 3 दशकांपासून हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गेल्यावर्षी याठिकाणी साकारण्यात आलेल्या अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. केवळ कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातीलच भाविक नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात.

“राज्यपालपद स्वीकारणार का? हे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रयत्न”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

यंदा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दक्षिण भारतातील श्री तिरुपती बालाजीच्या मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला असल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर यांनी दिली. येथील स्व. आत्माराम भोईर चौकात तब्बल 70 फूट उंच आणि 60 फूट लांबीच्या आकाराचे तिरुपती बालाजी मंदिर याठिकाणी साकारण्यात आले असून गेल्या महिन्याभरापासून दिवस रात्र त्याचे काम सुरू होते. त्यासोबतच स्व. व्ही.बी.भोईर चौक ते आत्माराम भोईर चौकापर्यंत सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यासह वेगवेगळे देखावेही उभारण्यात आले आहेत.

ST Bus : सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीची UPI ची मात्रा..! यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे परिवहन मंत्र्‍यांच्या सूचना

याठिकाणी उद्या विराजमान होणाऱ्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि सुंदर देखावा पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, गणेशोस्तव समितीचे अध्यक्ष भरत भोईर यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Magnificent view of tirupati balaji temple realized during maghi ganeshotsav 31st year of the board under the leadership of mla bhoir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • kalyan
  • Mahayuti
  • Vishwanath Bhoir

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
3

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव
4

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.