Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: ‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेचे कामकाज जनतेला थेट पाहता यावे, यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करण्याच्या मागणीसाठी शहरातील समाजसेवकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. महासभेतील चर्चा, निर्णय प्रक्रिया आणि नगरसेवकांची भूमिका नागरिकांसमोर पारदर्शकपणे यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 18, 2026 | 03:55 PM
‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन

‘महासभा लाईव्ह का नाही?’ मिरा-भाईंदर महापालिकेबाहेर समाजसेवकांचे ठिय्या आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • महासभेचे कामकाज जनतेला थेट दाखवा!
  • लाईव्ह स्ट्रीमिंगच्या मागणीसाठी महापालिकेबाहेर आंदोलन
  • समाजसेवकांचा सवाल
 

विजय काते, मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी महासभेचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करावे, या मागणीसाठी शहरातील समाजसेवकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. महासभेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या आंदोलनातून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष नागरिकांच्या या मागणीकडे वेधण्यात आले.

‘महासभा लाईव्ह का नाही?’

आंदोलकांनी यावेळी “देशाचे सर्वोच्च न्यायालय, लोकसभा आणि विधानसभा यांचे कामकाज जनतेला लाईव्ह पाहता येते, मग मिरा-भाईंदर महानगरपालिकेची महासभा लाईव्ह का नाही?” असा सवाल उपस्थित केला. महापालिकेच्या महासभेत शहराशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. या निर्णयांवर चर्चा कशी होते, कोणते नगरसेवक कोणती भूमिका मांडतात आणि कोणत्या मुद्द्यांवर निर्णय घेतला जातो, याची माहिती नागरिकांना थेट मिळावी, अशी आंदोलकांची भूमिका आहे.

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेत पुन्हा राजकीय रणकंदन; शिवसेना नगरसेविकांचा सभात्याग

‘जनतेच्या पैशातून बैठक, मग कामकाजही जनतेला दाखवा’

महासभेतील बैठकींसाठी जनतेच्या पैशातून जेवणाची व्यवस्था केली जाते, मग त्याच जनतेला महासभेचे कामकाज थेट दाखवण्यास प्रशासनाला अडचण काय, असा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला. महापालिकेचा पैसा हा नागरिकांच्या करातून येतो. त्यामुळे महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेबाबत नागरिकांना माहिती मिळणे हा पारदर्शक प्रशासनाचा महत्त्वाचा भाग असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

महासभेचे लाईव्ह स्ट्रीमिंग झाल्यास काय फायदा?

महासभेचे नियमित लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झाल्यास नागरिकांना घरबसल्या महापालिकेतील कामकाज पाहता येईल. यामुळे महासभेतील चर्चा नागरिकांना थेट समजेल, नगरसेवकांची भूमिका जनतेसमोर स्पष्ट होईल, महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेची माहिती मिळेल, महापालिका प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता वाढेल, नागरिकांचा स्थानिक स्वराज्य संस्थेतील सहभाग वाढण्यास मदत होईल. ‘कामकाज जनतेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न? यासारख्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो.

दरम्यान, आंदोलकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत महासभेचे कामकाज जनतेपासून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे का? असा सवाल उपस्थित केला. महापालिकेतील कारभार पारदर्शक असावा आणि नागरिकांना त्यांच्या पैशातून चालणाऱ्या प्रशासनाच्या कामकाजाची माहिती मिळावी, यासाठी महासभेचे लाईव्ह स्ट्रीमिंग तातडीने सुरू करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

या मागणीवर महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाची भूमिका काय असेल, तसेच महासभेचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जातो का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Web Title: Mira bhayandar municipal corporation general body meeting live streaming protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • maharashtra
  • mira bhayandar
  • Mumbai

संबंधित बातम्या

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
1

दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना मदत किती मिळणार? शेतकऱ्यांची उत्सुकता ताणली; पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
2

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
3

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती
4

तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.