Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira-Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचा कहर! टँकरचे दर 50 टक्क्यांनी वाढले

Mira-Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये १० टक्के पाणीकपातीमुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे. खासगी टँकरच्या ५०० लिटर पाण्याचे दर ४०० रुपयांवरून ६०० रुपयांपर्यंत वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 27, 2026 | 07:13 PM
Mira-Bhaindar : मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचा कहर! टँकरचे दर 50 टक्क्यांनी वाढले

Mira-Bhaindar : मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचा कहर! टँकरचे दर 50 टक्क्यांनी वाढले

Follow Us
Follow Us:
  • खासगी टँकरचे दर दीडपट वाढले; नागरिक हैराण
  • 500 लिटर पाण्यासाठी आता 600 रुपयांपर्यंतचा खर्च
  • दरवाढीच्या तक्रारींवर कारवाईचे महापालिकेचे आश्वासन
 

विजय काते, मिरा- भाईंदर

मिरा-भाईंदर (Mira-Bhayandar) शहरात स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी (MIDC)कडून करण्यात आलेल्या 10 टक्के पाणीकपातीमुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून, याचा फायदा घेत खासगी टँकरचालकांनी पाण्याच्या दरात मोठी वाढ केल्याचे समोर आले आहे. यापूर्वी 500 लिटर पाण्यासाठी सुमारे 400 रुपये आकारले जात होते. मात्र, आता याच पाण्यासाठी नागरिकांना 600 रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे आधीच पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

मिरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (MIDC) दररोज सुमारे 200 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने 10 टक्के पाणीकपात लागू केली आहे. या निर्णयानुसार आठवड्यातील ठरावीक कालावधीत स्टेम आणि एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. या कपातीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

शुक्रवारपासून शहरातील विविध भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला असला, तरी कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करता आलेला नाही. विशेषतः जुन्या इमारती आणि दाट लोकवस्तीच्या परिसरातील रहिवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. दैनंदिन वापरासाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

जुन्या इमारती आणि स्वतंत्र घरांना सर्वाधिक फटका

महापालिकेचे टँकर प्रामुख्याने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना पाणीपुरवठा करतात. त्यामुळे जुन्या इमारतींमध्ये तसेच स्वतंत्र घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना 500 लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. शहरात महापालिकेच्या पाण्यासह विंधन विहिरी आणि तलावांमधून पाणीपुरवठा करणारे खासगी टँकरचालक कार्यरत आहेत. गेल्या चार दिवसांत पाणीटंचाईमुळे या टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

वाढत्या मागणीचा परिणाम पाण्याच्या दरांवर झाला आहे. यापूर्वी 500 लिटर पाण्यासाठी साधारण 400 रुपये आकारले जात होते. आता हे दर 600 रुपयांपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना प्रत्येक टँकरमागे सुमारे 200 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. म्हणजेच पाण्याच्या दरात जवळपास 50 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Pradeep Purnekar Murder Case: पतीची ७ वेळा चौकशी, आता थेट माजी महापौर! पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास ऐन वळणावर

पाणीटंचाईसोबत दरवाढीचे दुहेरी संकट

एकीकडे महापालिकेकडून नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, तर दुसरीकडे खासगी टँकरचे वाढलेले दर नागरिकांच्या खिशाला कात्री लावत आहेत. पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि दैनंदिन वापरासाठी पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात खासगी टँकरचालकांच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना! सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला 6 हजार रुपयेbhayandarB

तक्रारींची दखल; पुरावे दिल्यास कारवाई

दरम्यान, मिरा-भाईंदर शहरात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारे काही पुरवठादार जादा दर आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. अशा टँकरचालकांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी जादा दर आकारल्याचे पुरावे देऊन अधिकृत तक्रार केल्यास संबंधित टँकरचालकांवर कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आता पाणीकपातीच्या काळात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासोबतच खासगी टँकरच्या दरांवर महापालिका कशा प्रकारे नियंत्रण ठेवते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाई का निर्माण झाली आहे?

    Ans: स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आल्याने शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

  • Que: . खासगी टँकरच्या पाण्याचे दर किती वाढले आहेत?

    Ans: यापूर्वी ५०० लिटर पाण्यासाठी सुमारे 400 रुपये आकारले जात होते. आता हे दर 600 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

  • Que: पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका कोणाला बसत आहे?

    Ans: जुन्या इमारतींमध्ये आणि स्वतंत्र घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

Web Title: Mira bhayandar water shortage private tanker rates increase 50 percent rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • MIDC
  • mira bhaindar
  • Water Tanker

संबंधित बातम्या

Palghar Protest : गोळ्या घातल्या तरी जमिनी देणार नाही! प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक; उद्योगमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
1

Palghar Protest : गोळ्या घातल्या तरी जमिनी देणार नाही! प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक; उद्योगमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

Badlapur News: बदलापूर एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे उल्हासनदी धोक्यात; रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्याने जलप्रदूषण
2

Badlapur News: बदलापूर एमआयडीसीच्या निष्काळजीपणामुळे उल्हासनदी धोक्यात; रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटल्याने जलप्रदूषण

Sanjay Gandhi National Park : रानडुकराच्या शिकारीत गोळीबार, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू लपवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र
3

Sanjay Gandhi National Park : रानडुकराच्या शिकारीत गोळीबार, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू लपवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद
4

टंचाई निवारणार्थ 13.84 कोटी; टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी 11 कोटींची तरतूद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.