Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : ठेकेदारांविरोधात घोषणाबाजी; स्मशानभूमीतील कंत्राटी कामगारांचे तिरडी आंदोलन

महापालिकेच्या विविध स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचे दफन-दहन तसेच स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या कंत्राटी कामगारांनी स्मशान भूमीत तीव्र आंदोलन छेडलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 10, 2026 | 11:35 AM
Mira Bhayander : ठेकेदारांविरोधात घोषणाबाजी; स्मशानभूमीतील कंत्राटी कामगारांचे तिरडी आंदोलन
Follow Us
Follow Us:
  • ठेकेदारांविरोधात घोषणाबाजी;
  • स्मशानभूमीतील कंत्राटी कामगारांचे तिरडी आंदोलन
मिरा-भाईंदर/ विजय काते : महापालिकेच्या विविध स्मशानभूमींमध्ये मृतदेहांचे दफन-दहन तसेच स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या कंत्राटी कामगारांनी स्मशान भूमीत तीव्र आंदोलन छेडलं आहे. गेल्या दोन महिन्यांचे वेतन थकल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (9 एप्रिल) मीरारोड येथील नवशा रूपा वावर मुक्तीधाम स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर या कामागारांनी ठेकेदार आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कामगारांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे वेतन अद्याप न मिळालं नसल्याची भूमिका ठामपणे मांडली. या दोन महिन्यांत उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचं कंत्राटदारांनी ठेकेदारांना सांगितलं. मात्र ठेकेदार वेतन देण्यास टाळाटाळ करत असल्याचं कंत्राटदारांनी सांगितलं. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान कामगारांनी तिरडी उभारून ठेकेदार व पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Dombivli News: डोंबिवलीमध्ये धोकादायक ‘सुमती निवास’मुळे नागरिकांचा जीव धोक्यात; कारवाई कधी होणार?

विशेष म्हणजे आंदोलन सुरू असतानाही अंत्यसंस्कारासाठी आलेल्या मृतदेहांचे दफन व दहन करण्याचे कार्य कामगारांनी माणुसकीच्या भावनेतून सुरूच ठेवले. स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देतानाही सामाजिक जबाबदारीचे भान राखल्यामुळे या कामगारांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिरा-भाईंदर शहरात महापालिकेच्या एकूण 16 स्मशानभूमी आणि दफनभूमी असून येथे सेवा देण्यासाठी पालिकेने कंत्राटी पद्धतीवर 58 कामगारांची नियुक्ती केली आहे. या कामांचा ठेका दोन वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आला आहे. त्यापैकी एका कंपनीकडून वेतन वेळेवर दिले जात असले तरी दुसऱ्या कंपनीकडून सातत्याने विलंब होत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

कामगारांच्या म्हणण्यानुसार, वेतन थकविण्याबरोबरच ठेकेदाराकडून मृतदेह हाताळण्यासाठी आवश्यक सुरक्षा साहित्य, दफन-दहनासाठी लागणारे साहित्य तसेच स्वच्छतेसाठी लागणारी साधनेही उपलब्ध करून दिली जात नाहीत. परिणामी अनेक वेळा कामगारांना स्वतःच्या पैशातून साहित्य खरेदी करून काम करावे लागत आहे.

पालिकेने ठेकेदारासोबतच्या करारामध्ये कामगारांचे वेतन वेळेत देणे बंधनकारक केले असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत पालिका प्रशासनावरही कामगारांनी निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे. ठेकेदारावर कारवाई न झाल्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, आंदोलनाची दखल घेत सायंकाळी महापालिकेचे अधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी कामगार प्रतिनिधींशी संपर्क साधून शुक्रवारी थकीत वेतनाबाबत चर्चेसाठी बैठक बोलावली. आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी कामगार संघटनेचे मिरा-भाईंदर अध्यक्ष मंगेश मोरे, पदाधिकारी कमलेश घरत आणि मनोहर हणवते यांनी केले.

यावेळी मंगेश मोरे म्हणाले की, “पालिकेने करारात स्पष्ट सूचना देऊनही ठेकेदार कामगारांचे वेतन वेळेवर देत नाही. आवश्यक साहित्य पुरविले जात नाही. एप्रिल महिना सुरू होऊनही फेब्रुवारी-मार्चचे वेतन प्रलंबित आहे. शुक्रवारी होणाऱ्या चर्चेत ठोस तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.” या घटनेमुळे शहरातील अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या स्मशानभूमीतील कामगारांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

मीरा रोड येथे उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा! मंत्री संजय शिरसाट यांचे तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश

Web Title: Mira bhayander slogans raised against contractors contract workers in the cemetery staged a protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Marathi News
  • mira bhayandar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke Update:  ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना
1

Abhijeet Dipke Update: ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
2

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
3

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
4

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.