Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली… नक्की काय घडलं; पाहा Viral Video

Women Accident Video : स्मार्टफोनचा वापर ठरला घातक! नको त्या ठिकाणी स्मार्टफोनचा अतिवापर आपल्या समस्या कशा वाढवू शकतो याचे उत्तम उदाहरण तुम्हाला आताच्या व्हायरल व्हिडिओत पाहता येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2026 | 11:02 AM
मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली... नक्की काय घडलं; पाहा Viral Video

मोकळ्या रस्त्यावर ती एक चूक ठरली कारणीभूत, एका सेंकदातच मुलगी रस्त्याच्या आत सामावून गेली... नक्की काय घडलं; पाहा Viral Video

Follow Us
Follow Us:
  • रस्त्यावर चालताना एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे अनपेक्षित प्रसंग ओढावला.
  • मदतीसाठी एक अनोळखी व्यक्ती तात्काळ धावून आली.
  • व्हिडिओने सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहण्याचा महत्त्वाचा संदेश दिला.
सोशल मिडियावर दररोज हजारो व्हिडिओज व्हायरल होत असतात ज्यात आपल्याला कधी रंजक गोष्टी दिसतात तर काही अशा गोष्टी ज्या आपल्याला थक्क करतील. इथे बऱ्याचदा अपघातांचे दृष्य देखील शेअर केले जाते. अशात अलिकडेच इंटरनेटवर अशीच एक घटना शेअर करण्यात आली आहे ज्यात मुलीसोबत आगळा-वेगळा प्रकार घडून आल्याचे दिसले. मागील काही काळापासून लोकांमध्ये स्मार्टफोनचा वापर भरपूर वाढला आहे. आजकाल लोक रस्त्यावरुन चालतानाही स्मार्टफोनचा वापर करतात ज्यामुळे अपघात घडून येण्याची दाट शक्यता असते. सध्याच्या व्हिडिओतही अशीच काहीशी घटना घडून आल्याचे दिसले. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

रिलने केला घात! स्काॅरपिओची थारला जोरदार धडक, काही क्षणांतच आनंदाचे वातावरण शोकात बदलले, एकाचा मृत्यू; चित्तथरारक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

हा व्हिडिओ एका तरुणीसोबत घडलेल्या अपघाताचा आहे. मोकळ्या रस्त्यावरुन जातानाही ती एका अपघाताला बळी पडली ज्याचे मूळ कारण स्मार्टफोन ठरले. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात आपण घटनेचा तपशील पाहू शकतो. व्हिडिओमध्ये दिसते की, एक मुलगी मोकळ्या रस्त्यावर हातात स्मार्टफोन घेऊन चालत असते. तिचे संपूर्ण लक्ष हे तिच्या फोनमध्ये असते ज्यामुळे समोर असलेला मॅनहोल तिच्या नजरेस येत नाही. मॅनहोलचे झाकण उघडे असते ज्यामुळे तरुणी त्यावरुन चालताच मॅनहोलच्या आत जाऊन पडते. काही वेळाने दुरुनच एक व्यक्ती धावत पळत येऊन मॅनहोलमधूल तरुणीला बाहेर काढताना दिसतो. घटना नक्की कुठली आहे याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

घटनेचा हा व्हिडिओ @NewsLiberdade नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत ४ मिलियनहून अधिकचे व्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. स्मार्टफोनचा अतिवापर आपल्यासाठी कसा घातक ठरु शकतो याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओतून घेता येते. मागील काही काळापासून सोशल मिडियावर असे अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत ज्यात स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे लोक अपघाताला बळी पडल्याचे दिसून आले. आपल्या दैंनदिन जीवनात स्मार्टफोन महत्त्वाचा आहेच पण सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर किंवा वर्दळीच्या ठिकाणी याचा विचारपूर्वक वापर करावा.

🚨AGORA – Mulher cai em bueiro no RJ, fica presa após a tampa se fechar sobre ela e é resgatada por motoboy pic.twitter.com/4o3xK2ijMB — SPACE LIBERDADE  (@NewsLiberdade) June 1, 2026

एक चूक अन् अनर्थ घडला! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला आणि रुळाखाली चिरडली गेली आई-लेकाची जोडी; घटनेचा चित्तथरारक Video Viral

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘एका महिला मॅनहोलमध्ये तोल जाऊन पडली; झाकण तिच्यावर बंद झाल्यामुळे ती आतच अडकली आणि एका दुचाकीवरून डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने तिची सुटका केली’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले. एका यूजरने म्हटले की, “दैवाने कुणीतरी तिला पडताना पाहिले, नाहीतर ती अजूनही बेपत्ताच राहिली असती.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे यार!!! ती जेव्हा पडली, तेव्हा तिची हनुवटी मॅनहोलच्या झाकणाच्या कडेवर जोरात आदळली; नक्कीच तिचा एखादा दात किंवा कदाचित जबडाच तुटला असावा…” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अरे बापरे! ती ठीक असेल ना?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video girl falls into open manhole while using smartphone viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Accident
  • smartphone
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
1

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

नव्या Infinix स्मार्टफोनने वेधलं टेक विश्वाचं लक्ष, ‘हे’ भन्नाट फीचर ठरलं खास आकर्षण! फीचर पाहून व्हाल थक्क
2

नव्या Infinix स्मार्टफोनने वेधलं टेक विश्वाचं लक्ष, ‘हे’ भन्नाट फीचर ठरलं खास आकर्षण! फीचर पाहून व्हाल थक्क

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
3

तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral
4

वाघाने केला माणसावर जीवघेणा हल्ला; शूर कुत्र्याने प्राणाची बाजी लावून वाचवला मालकाचा जीव, काळजाचा ठोका चुकवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.