Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका

Navi Mumbai News: नवी मुंबईतील मोरबे मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ६ ऑक्टोबरला नवी मुंबईतील काही भागांचा १६ तास पाणीपुरवठा बंद राहणार असून, नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 04, 2026 | 02:25 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबईत ६ ऑक्टोबरला १६ तास पाणीपुरवठा बंद राहणार.
  • मोरबे मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचे काम होणार.
  • दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर ७ ऑक्टोबरला सकाळी आणि सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता
 

सिद्धेश प्रधान/नवी मुंबई :   नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मोरबे मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावर महत्त्वाचे देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार, दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते बुधवार, दि. ०७ ऑक्टोबर रोजी पहाटे ०२:०० वाजेपर्यंत (एकूण १६ तास) मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

हाती घेण्यात येणारी प्रमुख कामे

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील १३.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या सम्पचा चॅनेल विलग करण्यासाठी एम.एस. प्लेट बसवणे.

भोकरपाडा येथे नवीन मीटरिंग किऑस्क आणि २०५० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर जलमापक बसवणे.

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

सी.बी.डी. सेक्टर-७ येथे मोरबे मुख्य जलवाहिनीवर १८०० मि.मी. व्यासाचा बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवणे.

वाशी येथील अरेंजा सर्कलजवळ ७०० मि.मी. आणि महापे येथे ९०० मि.मी. व्यासाचे बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसवणे.

पाणीपुरवठा बंद असणारे भाग

या १६ तासांच्या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे-सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या सर्व विभागांमधील पाणीपुरवठा बंद राहील. याशिवाय सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोडमधील पाणीपुरवठा देखील बंद राहणार आहे.

कमी दाबाने पाणीपुरवठा

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवार, दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सर्व नागरिकांना या कालावधीत पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, पाणी जपून वापरावे आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Mira Bhayandar News: रुग्णालयात उपचारासाठी आले, पण लिफ्टच बंद! पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील गैरसोयींमुळे नागरिक हैराण

नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन

महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीचा विचार करून आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुरुस्तीच्या कालावधीत पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन शहर अभियंता शिरीष अरवाड यांनी केले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी ६ ऑक्टोबरपूर्वी घरातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करावे आणि पाणी जपून वापरावे.

या १६ तासांच्या पाणीबंदीमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता असली तरी, भविष्यातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही देखभाल आणि दुरुस्तीची कामे महत्त्वाची ठरणार आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Navi mumbai news 16 hour water cut morbe pipeline repair pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News
  • Water supply

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी
1

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra
2

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार
3

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार

पुण्यात पुन्हा पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी ठेवणार बंद
4

पुण्यात पुन्हा पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी ठेवणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.