
फोटो सौजन्य- chatgpt
पाम बीच रोडवरील सातत्याने वाढणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सानपाड्यासह प्रमुख जंक्शनवर उड्डाणपूल उभारण्याच्या पर्यायाचा अभ्यास करण्यास नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सहमती दर्शविली आहे. या उड्डाणपुलांमुळे या महत्त्वाच्या मार्गावरील अनेक सिग्नल टाळून मुख्य वाहतूक सुरळीतपणे पुढे जाणे शक्य होऊ शकते. सत्ताधारी भाजपचे आमदार ॲड. निरंजन डावखरे आणि नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या क्लायमेट अॅक्शन नाऊ (कॅन) फॉर एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) या व्यासपीठाने पाम बीच रोडवरील वाढती वाहतूककोंडी दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार आणि पाम बीच ग्रीन्सचे संयोजक श्रीकांत पतकी यांनी डॉ. शिंदे यांची भेट घेऊन प्रस्तावित उड्डाणपुलांमुळे मुख्य वाहतुकीला सात सिग्नलवर थांबावे न लागता सुरळीतपणे पुढे जाता येईल, याकडे लक्ष वेधले. त्यामुळे चौकांवरील प्रतिक्षा वेळ कमी होऊन पाम बीच रोडवर वाहनांची साचणारी कोंडी टाळण्यास मदत होऊ शकते.
डॉ. शिंदे यांनी ॲड. डावखरे आणि नॅटकनेक्टच्या कॅनच्या निवेदनांची दखल घेत उड्डाणपुलांच्या पर्यायाचा निश्चितपणे विचार करण्याचे आश्वासन दिले. पाम बीच रोडवरील वाहतूक प्रश्नावर मनपा आधीच आयआयटी-बॉम्बेशी संपर्कात असून, या प्रस्तावाबाबतही संस्थेचे तांत्रिक मत घेण्याची शक्यता आहे.
कुमार आणि पतकी यांनी यापूर्वी सत्ताधारी भाजपचे विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरेंची भेट घेतली होती. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांत विस्तारलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. या भेटीत विविध पर्यावरणीय प्रश्नांवर चर्चा झाली होती. त्यानंतर डावखरे यांनी पाम बीच रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मनपा आयुक्तांकडे मांडला. पाम बीच रोडवर मोठ्या प्रमाणावर आंतरशहरी वाहतूकही असते. पुणे, अलिबाग आणि गोव्याच्या दिशेने जाणारी हजारो वाहने वाशी येथे सायन-पनवेल महामार्गावरून वळसा घेऊन पाम बीच रोडचा वापर करतात. या वाहनांना मार्गावरील अनेक सिग्नलवर थांबावे लागत असल्याने आधीच वाढलेल्या वाहतूक भारात आणखी भर पडते.
प्रस्तावित उड्डाणपुलांमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या आणि विमानतळावरून येणाऱ्या वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळणार आहे. विमानतळ सुरू झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक वाढणार असल्याने सिग्नलमुक्त वाहतूक अधिक महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक वाहतूक विद्यमान चौकांमधून सुरू ठेवून मुख्य वाहतुकीसाठी सिग्नलमुक्त मार्ग उपलब्ध करून दिल्यास कोंडी, इंधनाचा अपव्यय आणि वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करण्यास मदत होऊ शकते, असे पर्यावरणवादी संघटनांनी म्हटले.
बी. एन. कुमार यांनी वाशी आणि नेरूळदरम्यानचा मोराज जंक्शन हा मोठा वाहतूक अडथळा असल्याचे सांगितले.
नेरूळ, टी. एस. चाणक्य, अक्षर आणि एनआरआय सीवूड या जंक्शनवरील वाहतूक समस्यांकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले.
मोराज जवशनवरील कोंडीमुळे वाहनचालकांना मोठा विलंब सहन करावा लागतो, इंधनाचा अपव्यय होतो आणि हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले होते.
उत्तर आणि दक्षिण दिशेने जाणाऱ्या मुख्या वाहतुकीसाठी थेट उड्डाणपूल उभारल्यासा सिग्नलमुक्त वाहतूक, होऊ शकते,
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: पाम बीच रोडवरील वाढती वाहतूक कोंडी कमी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाणपुलांचा पर्याय विचाराधीन आहे.
Ans: सानपाड्यासह मोराज जंक्शन, नेरूळ, टी. एस. चाणक्य, अक्षर आणि एनआरआय सीवूड यांसारख्या प्रमुख जंक्शनचा अभ्यास केला जात आहे.
Ans: हो. विमानतळाकडे जाणारी आणि विमानतळावरून येणारी वाहतूक वाढण्याची शक्यता असल्याने सिग्नलमुक्त मार्गामुळे वाहनचालकांना दिलासा मिळू शकतो.