Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: नवी मुंबईतील पाणीकपात अखेर स्थगित; ३० नोव्हेंबरला मोर्बे धरणातील पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा

नवी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणीकपात तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मोर्बे धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 21, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबईतील १० टक्के पाणीकपात तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे
  • मोर्बे धरणातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने निर्णय घेतला
  • बांधकामस्थळांच्या पाणी जोडण्या पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत
 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्यात आलेली १० टक्के पाणीकपात तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. नागरिकांची पाण्याची गरज, मोर्बे धरणातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा आणि सध्याचा पाण्याचा वापर यांचा विचार करून महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

‘एल निनो’ आणि ‘आय.ओ.डी.’च्या अंदाजासह जागतिक हवामान बदलाचा भारतीय मान्सूनवर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन यंदा सरासरी पाऊस ९२ ते ९४ टक्के राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यामुळे पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीने मे २०२६ पासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. तसेच जलतरण तलाव आणि सुरू असलेल्या बांधकामांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वापरावरही निबंध घालण्यात आले होते.

बांधकामस्थळांवरील पाणी जोडण्या पुन्हा सुरू

सुरू असलेल्या बांधकामस्थळांवरील पाणी जोडण्याही पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, या जोडण्यांमधून मिळणारे पाणी केवळ कामगार व कर्मचाऱ्यांच्या पिण्यासाठीच वापरण्याची अट घालण्यात आली आहे. पिण्याचे पाणी बांधकाम किंवा अन्य कारणांसाठी वापरले जात असल्याचे आढळल्यास संबंधित पाणी जोडणी तत्काळ खंडित करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. जलतरण तलावातील पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करण्यासाठी पाणी पुनर्चक्रणाची व्यवस्था करणे आणि पाण्याची नासाडी टाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश

नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन कपात स्तगित

१६ सप्टेंबर २०२५ रोजी मोर्थे घरणातील एकूण पाणीसाठा १०० टक्के, तर उपयुक्त पाणीसाठा ८४.४० टक्के होता, यंदा १६ सप्टेंबर २०२६ रोजी धरणातील एकूण पाणीसाठा ९१.०३ टक्के असून उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असला तरी सध्याची स्थिती समाधानकारक असल्याने आणि १० टक्के पाणीकपातीमुळे नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही कपात पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

Thane Metro News: ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा; गायमुख-कापूरबावडी मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट

३० नोव्हेंबरला पुन्हा आढावा

मोर्बे धरणातील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठ्याचा ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कालावधीसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाईल. उपलब्ध पाणीसाठा, प्रत्यक्ष पाणी वापर आणि पुढील वर्षीच्या पावसाळ्यापर्यंतची संभाव्य पाण्याची गरज यांचा विचार करून पाणीकपात कायम ठेवायची किंवा पुन्हा लागू करायची, याबाबत महानगरपालिका प्रशासन निर्णय घेणार आहे. दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करून पाण्याची बचत करावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Navi mumbai water cut suspended nmmc morbe dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Navi Mumbai
  • Navi Mumbai News
  • nmmc

संबंधित बातम्या

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश
1

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी
2

Lab Grown Diamond : भारतातच तयार होणार हिऱ्यांची संपूर्ण मूल्यसाखळी; अमित शाहांचं मोठं आवाहन, नवी मुंबईत ज्वेलरी पार्कची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.