Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानने इथेही मारली भारताची नक्कल, कॉपी केले भारताचेच निर्णय; हवाई बंदी अन्…

भारताने दणका दिल्यानंतर आज पाकिस्तान सरकारची महत्वाची बैठक पार पडली आहे. यामध्ये पाकिस्तानने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2025 | 05:18 PM
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानने इथेही मारली भारताची नक्कल, कॉपी केले भारताचेच निर्णय; हवाई बंदी अन्…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला केला. त्यामध्ये तब्बल 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत सरकार चांगले आक्रमक झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांना सोडणार नाही अशी भूमिका भारताने घेतली आहे. तर काल भारताने सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तर aआज पाकिस्तानने देखील काही महत्वाचे निर्णय घेतले आहे.

भारताने दणका दिल्यानंतर आज पाकिस्तान सरकारची महत्वाची बैठक पार पडली आहे. यामध्ये पाकिस्तानने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. पाकिस्तानने भारतासोबतच व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कंपन्यासोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्ताने देखील त्यांच्या येथील भारतीय उच्चायुक्तलयातील अधिकाऱ्यांना भारतात जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानने भारताप्रमाणेच अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानमधील भारतीयांचा व्हिसा रद्द केले आहे. तसेच त्यांना भारतात परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘सिंधु जल’ कराराला दिली स्थगिती

भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या आहेत. भारताने भारत-पाकिस्तान सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच १ मे पर्यंत वाघा बॉर्डर बंद राहणार आहे. तसेच भारतामधील पाकिस्तानचे उच्चयुक्तालय बंद करण्यात येणार आहे. पाकिस्तानी नागरिकांना या पुढे भारताचा व्हिसा मिळणार नाही. जे नागरिक व्हिसा घेऊन भारतात राहिले आहेत त्यांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Big Breaking: पहलगाम हल्ल्यावरून भारताने आवळल्या पाकच्या नाड्या; ‘सिंधु जल’ कराराला दिली स्थगिती

सरकारने घेतलेले नेमके निर्णय काय? 

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारत सरकार आक्रमक झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची अत्यंत महत्वाची बैठक घेतली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारताने १ मे पर्यन्त अटारी वाघा बॉर्डर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सिंधु जल कराराला स्थगिती; पाकिस्तानवर काय परिणाम? 

भारताने घेतलेल्या निर्णयाने पाकिस्तानची चांगलीच कोंडी होणार आहे. कारण या करारामुळेच पाकिस्तानमधील बराचसा भाग सिंचनाखाली येतो. त्यामुळे हा करार स्थगिती दिल्याने पाकिस्तानच्या कृषी, उद्योग, आर्थिक दृष्ट्या कोंडी होणार आहे.

काय आहे सिंधु जल करार?

१९६० च्या काळात भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार झाला होता. भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अयुब खान यांच्यात हा करार झाला होता. या सिंधू नदी जल करारानुसार रवी, बियास, सतलज या नद्यांच्या पाण्यावर भारताचे नियंत्रण असेल. तसेच सिंधू नदी, चिनाब आणि झेलम या नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचे नियंत्रण असेल असे या करारात ठरले होते.

 

Web Title: Pakistan government take decision imposes air ban on india and close atari border and business after pahalgaam terror attack on jammu kashmir news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 04:41 PM

Topics:  

  • India Government
  • Pahalgam Terror Attack
  • Pakistan News
  • shahbaaz sharif

संबंधित बातम्या

Earthquake in Pakistan: काही तासांतच दुसरा भूकंप; मध्यरात्री पाकिस्तानला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का
1

Earthquake in Pakistan: काही तासांतच दुसरा भूकंप; मध्यरात्री पाकिस्तानला ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral
2

PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत
3

पुतिनचा डबल गेम? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करुन पाकिस्तानला करणार ‘ही’ मोठी मदत

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका
4

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.