Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan Hindus: ‘आम्ही 3-4 टक्के हिंदूंना सहन करतोय…’ पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वातंत्र्यदिनी प्रक्षोभक अन् वादग्रस्त

Pakistan Hindu Population: पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी हिंदू लोकसंख्येसंदर्भात एक वादग्रस्त विधान केले. त्यांनी संयुक्त भारताच्या मुद्द्याचा उल्लेख करण्यासोबतच त्यांच्या आकडेवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 16, 2026 | 06:33 PM
Asif Ali Zardari Hindu population statement

Asif Ali Zardari Hindu population statement

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे वादग्रस्त विधान
  • आकडेवारीतील चुकीचा दावा
  • भारतातून तीव्र संताप व टीका

भारत आणि पाकिस्तान (India-Pakistan Conflict) यांच्यातील राजनैतिक संबंध आधीच कमालीच्या तणावातून जात असताना, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केलेल्या एका अत्यंत वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधानामुळे नवीन आंतरराष्ट्रीय वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त १४ ऑगस्ट रोजी इस्लामाबादमधील ‘यादगार-ए-फतेह’ विजय स्मारकात आयोजित एका औपचारिक सोहळ्यात बोलताना, झरदारी यांनी पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याकांविषयी बेताल वक्तव्य केले. “पाकिस्तान हा एक मुस्लिम बहुल देश असूनही, आम्ही देशातील ३ ते ४ टक्के हिंदू लोकसंख्येला सहन करत आहोत,” असे वक्तव्य करून त्यांनी हिंदू अल्पसंख्याकांना देशावरील ओझे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.

झरदारी यांच्या या वक्तव्यामुळे केवळ पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला नाही, तर संपूर्ण भारतातून या विधानाचा जोरदार निषेध केला जात आहे. आपल्या भाषणात झरदारी यांनी भारताच्या ‘अखंड भारत’ या संकल्पनेचा आवर्जून उल्लेख केला. “भारताचा स्वतःचा एक वेगळा राजकीय दृष्टिकोन आणि अजेंडा आहे. ते अखंड भारताचा विचार करतात. आम्ही मुस्लिम आहोत आणि ते हिंदू आहेत, पण आमची विचारसरणी अशी आहे की आम्ही ३-४ टक्के हिंदू लोकसंख्येला सहन करत आहोत आणि ते पाकिस्तानात आनंदाने व स्वातंत्र्याने राहत आहेत,” असा दावा झरदारी यांनी केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indonesia Earthquake: ‘सर्वत्र किंकाळ्या आणि शोक…’ इंडोनेशियात भूकंपाचा कहर, 38 जणांचा मृत्यू, 2,000 बेघर, पहा VIDEO

आसिफ अली झरदारी यांचा लोकसंख्येबाबत खोटा दावा

विशेष म्हणजे, आपल्या देशाचे राष्ट्रप्रमुख असूनही आसिफ अली झरदारी यांनी पाकिस्तानातील हिंदू लोकसंख्येची अत्यंत चुकीची आणि दिशाभूल करणारी आकडेवारी सादर केली. पाकिस्तानच्या २०२३ च्या अधिकृत जनगणनेच्या (2023 Pakistan Census) माहितीनुसार, देशात हिंदूंची एकूण संख्या सुमारे ५२ लाख इतकी आहे, जी पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ २.१७ टक्के आहे. झरदारी यांनी सांगितलेला ३ ते ४ टक्क्यांचा आकडा वास्तविकतेपेक्षा खूप फुगवून सांगितलेला आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पाकिस्तानातील हिंदूंची संख्या सातत्याने घटत चालली असून, जबरदस्तीने होणारे धर्मांतर आणि अत्याचारामुळे अल्पसंख्याक समुदाय अत्यंत भीतीखाली जगत आहे.

झरदारी यांनी भाषणात पुढे असा दावा केला की, पाकिस्तानातील हिंदू नागरिक पूर्णपणे स्वतंत्र आहेत आणि ते भारतात जाण्याऐवजी पाकिस्तानात राहणेच पसंत करतील. मात्र, त्यांचे हे विधान वास्तविक परिस्थितीशी अत्यंत विसंगत असल्याचे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या अहवालांवरून स्पष्ट होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-Israel: भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्रायलचा खास नजराणा; जेरुसलेममधील ऐतिहासिक ‘Chords Bridge’वर तिरंग्याची रोषणाई

‘सहन करतो’ या शब्दावर भारतातून तीव्र आक्षेप

झरदारी यांच्या या विधानानंतर भारतातून सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर क्षेत्रातील तज्ज्ञांनी कडक शब्दांत समाचार घेतला आहे. विद्वानांनी आणि विचारवंतांनी झरदारी यांच्या ‘सहिष्णुता’ किंवा ‘सहन करतो’ या शब्दाच्या वापरांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. एखाद्या देशाच्या संविधानाने तेथील सर्व नागरिकांना समान हक्क दिले असताना, राष्ट्रपती स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांसाठी ‘सहन करणे’ असा शब्दप्रयोग कसा करू शकतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे. लेखक आणि आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानचे संविधान कागदावर अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते, पण प्रत्यक्षात तिथे दररोज हिंदू आणि इतर अल्पसंख्याक मुलींचे अपहरण, सक्तीचे धर्मांतर, भेदभाव आणि टोळक्यांकडून होणाऱ्या हिंसेच्या (Mob Violence) घटना घडत आहेत.

प्रसिद्ध गीतकार आणि विचारवंत जावेद अख्तर यांनी देखील झरदारी यांच्या या विधानाचा अत्यंत खोचक शब्दांत समाचार घेतला. झरदारी यांच्यावर असलेल्या जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत, “झरदारी साहेबांना १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या कोणत्याही गोष्टीची कदर नसते, त्यामुळे ते ३-४ टक्के हिंदूंबद्दल असे बोलत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. पाकिस्तानच्या या बेताल वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर पाकिस्तानचा अल्पसंख्याकविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. स्वतःच्या देशातील गरिबी, महागाई आणि राजकीय अस्थिरतेवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी नेते नेहमीच भारतविरोधी आणि हिंदूविरोधी वक्तव्ये करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Pakistan president asif ali zardari controversial statement on hindu population marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • India-Pakistan Conflict
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू
1

Malaysia-Rohingya : UNच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष; 1,500 म्यानमार नागरिकांची घरवापसी सुरू

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव
2

World News :आता तरी युद्ध थांबेल का ? इराणचा पुन्हा अमेरिकेला कतार मार्फत शांततेचा प्रस्ताव

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य
3

US-Pakistan Relations : दहशतवादाबाबत सहानुभूती खपवून घेतली जाणार नाही; जयशंकरांचे अमेरिका-पाक संबंधांवर स्पष्ट भाष्य

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
4

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.