Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई, ठाणे परिसरातील विजेची चिंता अखेर मिटली, महापारेषणची बाभळेश्वर–कुडूस 400kV वीजवाहिनी कार्यान्वित

मुंबई आणि ठाणे परिसरातील विजेची चिंता अखेर आता मिटली आहे आणि 400kV ची वीजवाहिनी आता कार्यान्वित करण्यात आली असून महापारेषणाने मोठे पाऊल उचलले आहे. वाचा महत्त्वाची माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 11, 2026 | 12:08 AM
महापारेषणाची मोठी अपडेट

महापारेषणाची मोठी अपडेट

Follow Us
Close
Follow Us:
  • महापारेषणचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
  • आता ठाणे – मुंबईत वीजेची चिंता राहणार नाही 
  • विद्युत दाबामध्ये होणार सुधारणा  
मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचा (महापारेषण) महत्त्वाकांक्षी बाभळेश्वर–कुडूस ४०० के.व्ही. हा वीजवाहिनी प्रकल्प गुरूवारी (दि.९) पूर्ण होऊन वीजवाहिनी कार्यान्वित करण्यात आली. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि विश्वासार्ह होणार आहे. यामुळे सुमारे ५ मेगावॅट वीज नुकसान कमी होणार असून मुंबई महानगर प्रदेशातील विद्युत दाबामध्ये योग्य ती सुधारणा होणार आहे. तसेच या द्विपथ वाहिनीवरून सुमारे ३००० मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीजवहन क्षमता उपलब्ध होणार असून मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे.

२०१० मध्ये मंजूर झालेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी मेसर्स कल्पतरू प्रोजेक्टस इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीमार्फत करण्यात आली. सुरुवातीला २०१३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असलेला हा प्रकल्प विविध अडचणींमुळे लांबला होता. मात्र, गतिमान शासनामुळे आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयामुळे अखेर मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले.

द्विपथ वाहिनीची लांबी किती 

या प्रकल्पांतर्गत एकूण ७१५ मनोरे उभारण्यात आले असून सदर द्विपथ वाहिनीची लांबी सुमारे २२८ कि.मी. आहे. यापैकी नाशिक विभागात ४८५ मनोरे उभारणी आणि ३०४ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम, तर वाशी विभागात २३० मनोरे उभारणी आणि १५२ सर्किट कि.मी. तारा ओढण्याचे काम पूर्ण झाले आहे.

प्रकल्प राबविताना अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागला. पुणे जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या रेडिओ दुर्बिणीच्या (GMRT) परिसरातून मार्ग जात असल्याने विशेष परवानग्या घ्याव्या लागल्या. तसेच जमिनीचे मोबदले, वनविभाग परवानग्या, राईट ऑफ वे (मार्गाधिकार) (RoW) समस्या, साहित्य वाहतूक यांसारख्या अनेक आव्हानांवर मात करण्यात आली. काही भागात जंगलातून साहित्य वाहून नेण्यासाठी मानवी श्रमांचा वापर करावा लागला, तर काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर हॉटलाइन स्ट्रिंगिंग करून काम पूर्ण करण्यात आले.

महापारेषणमध्ये तब्बल 2623 रिक्त जागांसाठी भरती; 31 जुलैपर्यंत करता येणार अर्ज!

ताण होणार कमी 

या वीजवाहिनीमुळे सद्यस्थितीतील पडघे–बाभळेश्वर १ व २ या वीजवाहिनीवरील ताण कमी होणार असून प्रणालीची विश्वासार्हता वाढणार आहे. कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध होऊन मुंबई परिसरातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता सुलभ होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, महसूल विभाग, पोलिस आणि वनविभाग यांच्या सहकार्य व मदतीमुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे महापारेषणने म्हटले आहे. 

सांघिक कामाचे यश

मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली महापारेषणचे संचालक ( प्रकल्प/संचलन) सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. महेंद्र वाळके, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता महेश भागवत यांनी आणि त्यांच्या चमूने ही यशस्वी कामगिरी केली आहे. 

ऊर्जा विभागात होणार महा-भरती ; ‘महापारेषण’मध्ये होणार ८५०० पदांवर भरती

महत्त्वाचे मुद्दे 

  • मुंबई, ठाणे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम व स्थिर 
  • प्रकल्पामुळे सुमारे ५ मेगावॅट वीज नुकसान कमी होणार 
  • द्विपथ वाहिनीव्दारे ३००० मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीज वहन क्षमता 
  • मुंबई, ठाणे, पालघर व अहिल्यानगर जिल्ह्यांना मोठा फायदा 
  • एकूण ७१५ मनोरे उभारणी; सुमारे २२८ कि.मी. लांबीची वीजवाहिनी 
  • नाशिक विभागात ४८५ मनोरे, वाशी विभागात २३० मनोरे उभारणी 
  • GMRT परिसरातून मार्गामुळे विशेष परवानग्यांची गरज 
  • RoW, वनपरवानग्या, मोबदले यांसारख्या अडचणींवर मात 
  • जंगल भागात मानवी श्रम व हॉटलाइन स्ट्रिंगिंगचा वापर 
  • पडघे–बाभळेश्वर वीजवाहिनीवरील ताण कमी होणार 
  • कुडूस उपकेंद्राला अतिरिक्त वीज स्रोत उपलब्ध 
  • स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे सहकार्य 
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प पूर्ण
  • महापारेषणच्या अधिकाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचे यश

Web Title: Power concerns in mumbai and thane regions finally resolved mahatransco s babhaleshwarkudus 400 kv power line commissioned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:08 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Maharashtra News Update
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane Crime : ठाणे पोलीसांना मोठं यश; बेकायदा ऑइल तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
1

Thane Crime : ठाणे पोलीसांना मोठं यश; बेकायदा ऑइल तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

Thane Station News: ठाणे रेल्वे स्थानक होणार ‘हायटेक’; प्रवाशांसाठी वाढणार अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा!
2

Thane Station News: ठाणे रेल्वे स्थानक होणार ‘हायटेक’; प्रवाशांसाठी वाढणार अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा!

ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये भीषण आग; बचावकार्यात सुरक्षा रक्षकासह अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू
3

ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये भीषण आग; बचावकार्यात सुरक्षा रक्षकासह अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरीत खळबळबळ! जयगड पोलीस ठाणे हद्दीत गावठी हातबॉम्बचा स्फोट ! महिला गंभीर जखमी, २९ जिवंत बॉम्ब हस्तगत…
4

रत्नागिरीत खळबळबळ! जयगड पोलीस ठाणे हद्दीत गावठी हातबॉम्बचा स्फोट ! महिला गंभीर जखमी, २९ जिवंत बॉम्ब हस्तगत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.