Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

Pratap Sarnaik: मिरा-भाईंदरमधील कथित बेकायदेशीर बांधकामांच्या मुद्द्यावर प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत नगररचना विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. नियमबाह्य बांधकामांना परवानगी अथवा बेकायदेशीर बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र (CC) देण्याच्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 07, 2026 | 03:34 PM
‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

Follow Us
Follow Us:
  • ‘आमदार मोठा की कायदा?’
  • बेकायदेशीर बांधकामांवरून सरनाईकांचा मेहता यांच्यावर निशाणा
  • बेकायदेशीर सीसी प्रकरणात वास्तुविशारदाचा परवाना रद्द करा
विजय काते, भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील कथित बेकायदेशीर बांधकामे आणि त्यांना देण्यात आलेल्या परवानग्यांच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात संबंधित वास्तुविशारदाचा परवाना तात्काळ रद्द करून त्याच्यावर तसेच संबंधित मालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. या प्रकरणातील महापालिका अधिकाऱ्यांवर शासनाच्या स्तरावर योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र, पोलिसांनी संबंधित वास्तुविशारदाची कागदपत्रे आणि परवाना तपासून, नियमबाह्य प्रकार आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या मालकांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सरनाईक यांनी केली.

प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलं?

या प्रकरणात सेव्हन इलेव्हन कंपनीसह काही मोठ्या विकासकांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची व्यापक स्तरावर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील काही कागदपत्रे मीरा-भाईंदरचे पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्याकडे देण्यात आली असून, संबंधित फाईल्स ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले. “सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक वेळी न्यायालयात जाऊन न्याय मागावा लागणे हे शहरासाठी दुर्दैवी आहे. प्रशासनाने नियमबाह्य प्रकारांवर स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे,” असे सरनाईक म्हणाले.

मिरा-भाईंदर हादरलं! आक्षेपार्ह व्हिडीओचा धाक दाखवून १४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ६ जणांवर गुन्हा दाखल, दोघे गजाआड

दरम्यान, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरही सरनाईक यांनी गंभीर आरोप केले. मीरा-भाईंदरमधील विविध मालमत्ता आणि प्रकरणांमध्ये नरेंद्र मेहता किंवा त्यांच्या संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला. आदिवासी तसेच भूमिपुत्रांच्या जमिनींसंदर्भातील व्यवहारांमध्येही त्यांचे नाव येत असल्याचा आरोप त्यांनी केला. “प्रत्येक प्रकरणात नरेंद्र मेहता यांचे नाव येत असेल, तर मीरा-भाईंदर ही त्यांची स्वतःची मालमत्ता आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. या सर्व प्रकरणांकडे वरिष्ठ पातळीवर गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे सरनाईक यांनी सांगितले.

नरेंद्र मेहता यांच्यावर टीका

नरेंद्र मेहता यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजपच्या प्रतिमेचाही मुद्दा उपस्थित केला. “नरेंद्र मेहता यांचे नाव खराब होत नाही, तर मीरा-भाईंदरमधील भारतीय जनता पक्षाची प्रतिमा खराब होत आहे. लोक केवळ स्थानिक नेत्याला पाहून मतदान करत नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान करतात. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानेही या बाबीचा विचार करायला हवा,” असे ते म्हणाले. तसेच, “मी १७ वर्षे मीरा-भाईंदर शहराचा आमदार आहे. माझ्याविरोधात बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव आणल्याची एकही तक्रार नाही. जे कायदेशीर आहे ते कायदेशीर प्रक्रियेतूनच झाले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी बेकायदेशीर कामांमध्ये हस्तक्षेप न करता जनतेच्या हितासाठी प्रशासनाला योग्य दिशेने काम करण्यास सांगितले पाहिजे,” असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

कागदपत्रांची तपासणी

या प्रकरणाचा संबंध १४६ विधानसभा मतदारसंघाशी असल्याने, सर्व संबंधित कागदपत्रांची तपासणी करून सत्य समोर आणले जाईल, असे त्यांनी सांगितले. पोलिसांकडे देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये अनेक गंभीर बाबींचा उल्लेख असल्याचा दावाही त्यांनी केला. “एवढी मोठी रक्कम आणली कुठून, त्याचे अधिकृत व्यवहार काय आहेत, याचीही चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात पोलिस विभागातील अधिकारी, विकासक आणि इतर संबंधित व्यक्तींमध्ये काही संबंध आहेत का, याचीही तपासणी आवश्यक आहे,” अशी मागणी सरनाईक यांनी केली.

यापूर्वी उच्च न्यायालयाने मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केल्याचा उल्लेखही त्यांनी केला. लोकप्रतिनिधीच्या दबावामुळे एखादी परवानगी किंवा बांधकामाची मंजुरी रद्द केली जात असेल, तर “आमदार मोठा की कायदा?” असा सवाल न्यायालयाने उपस्थित केल्याचे त्यांनी सांगितले. सरनाईक यांनी पुढे म्हटले की, “हे प्रकरण दिसते त्यापेक्षा खूप मोठे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ एका-दोन अधिकाऱ्यांपुरती चौकशी मर्यादित न ठेवता संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. सत्य समोर आणण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे कारवाई करावी.”

या प्रकरणामुळे नगरविकास विभाग तसेच महायुती सरकारची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठीही शासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. “जनतेला त्रास होत असेल आणि बेकायदेशीर प्रकार सुरू असतील तर लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी म्हणून मला रस्त्यावर उतरावेच लागेल. सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणून आमची जबाबदारी आहे की, प्रशासनावर कोणताही अनावश्यक दबाव येऊ नये आणि जनतेला न्याय मिळावा,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.ट

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

Web Title: Pratap sarnaik targets town planning department over illegal constructions in mira bhayandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Narendra Mehta
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

SIR Form Controversy: SIR फॉर्म प्रकरणावरून खळबळ! मतदारांचे SIR फॉर्म सफाई कर्मचाऱ्याकडे कसे? तेजस्वी पाटील यांचा गंभीर सवाल
1

SIR Form Controversy: SIR फॉर्म प्रकरणावरून खळबळ! मतदारांचे SIR फॉर्म सफाई कर्मचाऱ्याकडे कसे? तेजस्वी पाटील यांचा गंभीर सवाल

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
2

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा
3

Mira Bhayandar News: प्रवाशांच्या मागणीचा फॉर्म्युला ठरला फायदेशीर; एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ, तोटा भरून निघण्याची आशा

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा
4

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.