Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमध्ये महायुतीला बंडखोरीचे ग्रहण ! माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

कल्याण पूर्वेत झालेल्या बंडखोरीचे पडसाद कल्याण पश्चिम मतदारसंघात उमटले आहेत. आज कल्याण पश्चिममधून भाजपचे नेते. माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 29, 2024 | 09:39 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Follow Us:

कल्याण पूर्वेतील महायुतीमध्ये झालेल्या बंडखोरीचे पडसाद कल्याण पश्चिमेत देखील उमटले असून कल्याण पूर्वेत महायुतीच्या वतीने असलेल्या भाजपाच्या अधिकृत उमेदवारासमोर शिवसेनेने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आज आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे माजी आमदार तथा भाजपा कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख नरेंद्र पवार यांनी सांगितले. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण पश्चिमेत मोठे शक्तिप्रदर्शन करत नरेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आपल्या समर्थकांसह वाजत गाजत भव्य रॅली काढून आपली ताकद दाखवली.

हे देखील वाचा- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये कोण मारणार बाजी? ठाकरे शिंदे गटात होणार काटे की टक्कर

कल्याण पूर्वेतील बंडखोरीचे पडसाद कल्याण पश्चिममध्ये

महायुतीचा धर्म पाळण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमने केला होता, पण कल्याण पूर्वेत भाजपाच्या अधिकृत उमेदवारासमोर बंडखोरी झाली आहे. म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केला असून पूर्ण ताकदीनिशी कल्याण पश्चिम विधानसभा जिंकून दाखवेल असा विश्वास हा जनसमुदाय दाखवून देत आहे. नेत्यांनी युतीचा धर्म पाळण्यास सांगितला आहे परंतु कार्यकर्त्यांची ऐकण्याची मनस्थिति नाहीये त्यामुळे हा अपक्ष अर्ज दाखल करत असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.

हे देखील वाचा-

बंडखोरीमुळे महायुतीचे नुकसान होण्याची शक्यता

कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये थेट सामना होणार होता मात्र नरेंद्र पवार यांच्या उमेदवारीने तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत जर पक्षश्रेष्ठींना कल्याणमधील दोन्ही मतदारसंघातील बंडखोरी शमवता आल्यास महायुतीला त्याचा फायदा होऊ शकतो अन्यथा या बंडखोरीमुळे महायुतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कल्याणमधील दोन्ही मतदारसंघ हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात येत असल्याने हे दोन्ही मतदारसंघ महायुतीकरिता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकरिता महत्वाचे आहेत.

हे देखील वाचा- मनसेच्या उमेदवाराचा हलगर्जीपणा नडला, वेळेत न पोहोचल्याने अर्ज दाखल करून घेण्यास नकार

कल्याण पूर्वेत महेश गायकवाडांचा अपक्ष अर्ज

कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड हे भाजपकडून विद्यमान आमदार आहेत. मात्र शिंदेगटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्थानकात केलेल्या गोळीबारामुळे ते जेलमध्ये आहेत. त्यामुळे भाजपने गायकवाड यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुलभा  गायकवाड यांना उमेदवारी दिली त्यामुळे या उमेदवारीविरुद्ध शिंदे गटाचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीचे थेट पडसाद कल्याण पश्चिममध्ये दिसून येत आहेत. महेश गायकवाड यांच्या बंडखोरीमुळेच माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अपक्ष अर्ज भरला आहे असे त्यांनी सांगितले आहे.

कल्याण पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघात सध्या महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे इथे पारडे जड आहे. मात्र या जागांवर बंडखोरीचे ग्रहण महायुतीसाठी घातक ठरणार आहे.

Web Title: Rebellion to the mahayuti in kalyan former mla narendra pawar filed an independent candidature application

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 09:39 PM

Topics:  

  • BJP
  • kalyan
  • Maharashtra Assembly election 2024
  • shivsena

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
2

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
3

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित
4

प्लास्टरसाठी रुग्णाकडून 400 रुपयांची लाच; पैसे मागणाऱ्या ‘त्या’ कामगाराला केले निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.