Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याण पश्चिमेत वाहतूक कोंडी सोडण्यासाठी सचिन बारसेंना निवडून द्या ! शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंचे आवाहन

कल्याण पश्चिममध्ये वाहतूक कोडी या महत्वाच्या समस्यमेची कोंडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सचिन बारसे सोडवू शकतील त्यामुळे त्यांना निवडून देण्याचे आवाहन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Nov 09, 2024 | 07:47 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये वाहतूक कोंडीसह वाढत्या गुन्हेगारीचा गंभीर प्रश्न असून ते सोडवण्यासाठी समंजस अशा सचिन बासरे यांना निवडून देण्याचे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणात केले. कल्याण पश्चिमेतील महाविकास आघाडी उमेदवार सचिन बासरे यांच्या निवडणूक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

कल्याण पश्चिमेतील वाहतूक कोंडीचा फटका आज या पत्रकार परिषदेसाठी येत असताना आपल्याला बसला आहे. त्यामुळे सचिन बासरे यांना निवडून दिल्यास इथल्या चाकरमान्यांची ही महत्त्वाची समस्या सोडवून त्यांना नक्कीच दिलासा देतील असा विश्वास अंधारे यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन बासरे, उपनेते अल्ताफ शेख, विधानसभा संघटक किशोर शुक्ला, ज्येष्ठ शिवसैनिक रवी कपोते, दिनेश शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश बोरगावकर यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा- पंढरपूर-मंगळवेढ्यात काँग्रेसमध्ये फूट; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

तर गद्दारांच्या सरकारने सत्ताबदल झाल्यानंतर आपल्या मर्जीतील पोलीस अधिकारी आणून बसवले आहेत. आणि जे लोकं त्यांच्याविरोधात बोलतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असून सत्ताधारी इकडे दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी यावेळी केला. तसेच “जे बटेंगे तो कटेंगे” च्या घोषणा देतात ते स्वतःच्या सख्ख्या भावासोबत राहू शकत नाही. अशा लोकांनी महाराष्ट्रात येऊन जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

निवडणूक आयोगाला लक्ष्य करताना त्यांनी सांगितले की निवडणूक आयोगाने पक्षपातीपणे वागू नये, आमच्या मागे ससेमिरा लावत असताना समोरच्या उमेदवाराकडे डोळेझाक करत असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. तर मनसेवर टिका करताना त्यांची नेमकी भूमिका काय आहे हेच कळत नसल्याचे सांगत कल्याण पश्चिमेतील नागरिक यंदा मतांचे विभाजन न करता सचिन बासरे यांना निवडून देतील असा विश्वास सुषमा अंधारे यांनी यावेळी व्यक्त केला.

हे देखील वाचा- ‘महाराष्ट्रावरील गद्दारीचा डाग ही अमित शाहांची देण…’; पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात

कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विश्वनाथ भोईर हे विद्यमान आमदार निवडणूक लढवत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपच्या कपील पाटील यांना मताधिक्क्य मिळाले होते. त्यामुळे शिंदेसेनेचे पारडे जड असले तरी मात्र विधानसभा निडवणुकीमध्ये पहिल्यांदाच ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकल्याने येथील लढाई अत्यंत चुरशीची होणार आहे.   2009 पासून येथे मनसे, भाजप, शिवसेना असे तीन वेगवेगळ्या पक्षाचे आमदार जनतेने निवडून दिले आहेत. आता या निवडणुकीत जनता कोणत्या पक्षाला कौल देते हे कल्याणमधील राजकीय वर्चस्वाकरिता महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Shiv sena deputy leader sushma andharen appeals to elect sachin barse to ease traffic congestion in kalyan west

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 07:44 PM

Topics:  

  • kalyan
  • Maharashtra Assembly election 2024
  • Shivsena UBT
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक
1

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी
2

KDMC News : कल्याणमधील ‘या’ भागात रस्ते आणि नाल्यांची दुरावस्था, नागरीकांनी समस्या मांडताच माजी नगरसेवकांनी केला पाहणी

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र
3

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.