Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाचा यंदा २१वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे. विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल २१ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून, ५०० हून अधिक पथकांच्या सहभागामुळे यंदाच्या दहीहंडीचा थरार आणखी रंगणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 05, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 21 लाखांचे बक्षीस
  • संकल्प दहीहंडी महोत्सव कधी आणि कुठे होणार?
  • गोविंदांच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी कोणत्या सुविधा केल्या?
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाचा यंदा २१वा वर्ष मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘संकल्प दहीहंडी उत्सव, संकल्प नव्या उंचीचा!’ या ब्रीदवाक्यानुसार आयोजित या महोत्सवात विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी तब्बल २१ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

‘संकल्प दहीहंडी उत्सव संकल्प नव्या उंचीचा!’ या ब्रीदवाक्यानुसार वागळे इस्टेट परिसरात गेल्या दोन दशकांपासून अविरत सुरू असलेल्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवाचे यंदाचे २१ वे वर्ष मोठ्या दिमाखात साजरे होणार आहे. यंदा दहीहंडीचा जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी तब्बल २१ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तसेच १० थर लावणाऱ्या पथकास १० लाख आणि ठाण्यात प्रथम ९ थर लावणाऱ्या पथकास ५ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असल्याची घोषणा आमदार रविंद्र फाटक यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेस नगरसेवक राजेंद्र फाटक, नगरसेवक दीपक वेतकर, स्वामी समर्थ इव्हेंटचे प्रमुख अमीर हडकर आणि प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक उपस्थित होते.

आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार महोत्सव

शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून वागळे इस्टेट येथील रघुनाथ नगर, संकल्प चौक येथे संकल्प प्रतिष्ठानचा दहीहंडी महोत्सव रंगणार आहे. उत्सवाच्या उत्साहासोबतच गोविंदांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आयोजकांनी चोख सुरक्षा नियोजन केले आहे. थर रचणाऱ्या गोविंदांसाठी हेल्मेट, सेफ्टी रोप, सुरक्षा जॅकेट आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

५०० हून अधिक नामांकित गोविंदा पथके होणार सहभागी

यंदाच्या महोत्सवात मुंबई, ठाणे आणि उपनगरांतील ५०० हुन अधिक नामांकित गोविंदा पथके सहभागी होणार असल्याने वागळे इस्टेटमध्ये थरांचा महाथरार अनुभवायला मिळणार आहे. मुख्य दहीहंडी उत्सवाबरोबरच ४ सप्टेंबर रोजी रात्री विशेष सेलिब्रिटी दहीहंडीचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची घोषणा आमदार रविंद्र फाटक यांनी केली.

Thane Dahi Handi 2026: रेमंडमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडीचा उत्साह; ११ थरांसाठी २१ लाखांचे बक्षीस

दहीहंडीच्या उत्साहासोबतच मनोरंजनाची मेजवानी

गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी यंदा मनोरंजनाची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. अमीर हडकर यांच्या स्वामी समर्थ इव्हेंट आणि मराठी बझ यांच्या संयुक्त विद्यमाने मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामांकित कलाकार, गायक आणि नर्तक या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे थरांचा थरार, गोविंदांचा उत्साह आणि मनोरंजनाची मेजवानी असा तिहेरी अनुभव यंदाच्या संकल्प दहीहंडी महोत्सवात पाहायला मिळणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Thane dahi handi 2026 sankalp pratishthan handi world record 21 lakh prize

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Dahi Handi 2026
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Dahi Handi Wishes: गोविंदाच्या जयघोषात रंगू दे उत्सव! नातेवाईक आणि मित्रपरिवाराला पाठवा दहीहंडीच्या सुंदर शुभेच्छा
1

Dahi Handi Wishes: गोविंदाच्या जयघोषात रंगू दे उत्सव! नातेवाईक आणि मित्रपरिवाराला पाठवा दहीहंडीच्या सुंदर शुभेच्छा

Dahi handi 2026: दहीहंडी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीच का फोडतात? बालकृष्णाच्या या परंपरेमागची कथा जाणून घ्या
2

Dahi handi 2026: दहीहंडी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशीच का फोडतात? बालकृष्णाच्या या परंपरेमागची कथा जाणून घ्या

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार
3

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात
4

Jalgaon News: गोविंदा आला रे…! जळगावात नारीशक्तीचा जल्लोष, 685 युवती फोडणार 15 दहीहंड्या, तयारी जोरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.