Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Dahi Handi 2026: टेंभीनाक्यावर दहीहंडीचा थरार; मुंबई-ठाण्याच्या गोविंदांना मिळणार १.५१ लाखांचे बक्षीस

टेंभीनाक्याच्या ऐतिहासिक दहीहंडी उत्सवाची यंदाही जय्यत तयारी सुरू असून, ५ सप्टेंबर रोजी ठाण्यात गोविंदांचा थरार रंगणार आहे. मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या पथकांना प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 02, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र मानाच्या हंडीचे आयोजन
  • गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी लोककला, लावणी आणि मनोरंजनाची मेजवानी
  • नेत्रदीपक रोषणाई आणि दर्जेदार ध्वनियंत्रणामुळे टेंभीनाका परिसर उजळणार
 

ठाण्यातील दहीहंडी म्हटलं की टेंभीनाक्याच्या उत्सवाची चर्चा आवर्जून होते. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, भगव्या पताका आणि मानवी मनोऱ्यांचा थरार यामुळे टेंभीनाका दहीहंडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेली ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा रे गोपाळा’ चा जयघोष, भगव्या पताकांनी सजलेला परिसर आणि मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवायला ठाणेनगरी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका दहीहंडी उत्सवाची परंपरा यंदाही तितक्याच दिमाखात साजरी होणार असून, शनिवार, ५ सप्टेंबर रोजी टेंभी नाक्यावर दहीहंडीचा थरार रंगणार आहे. १५१००० रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या महोत्सवात मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

पथकांना दीड लाखाचे रोख पारितोषिक

दोन्ही शहरांतील यशस्वी पथकांना प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. बक्षीस जाहीर होताच त्याच दिवशी रोख स्वरूपात देण्याची टेंभी नाक्याची परंपरा यंदाही कायम राखली जाणार आहे.

रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ

यंदा टेंभीनाक्यावर मनोरंजनाची मेजवानी

धर्मवीर आनंद दिघे यांनी मुंबईचा दहीहंडीचा उत्साह ठाण्यात आणून टेंभीनाक्यावरील उत्सवाला वेगळी ओळख मिळवून दिली. आनंद दिघे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा यशस्वीपणे पुढे नेत टेंभीनाक्याच्या हंडीला ठाण्याची ‘मानाची हंडी’ म्हणून नवी ओळख मिळवून दिली. गोविंदांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी यंदा टेंभीनाक्यावर मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.

लोककला, लावणीचा ठेका, नेत्रदीपक रोषणाई आणि दर्जेदार ध्वनीयंत्रणेचा उत्सव

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार, लोकप्रिय गायक आणि मालिकांमधील तारे-तारका या सोहळ्यास हजेरी लावणार आहेत, महाराष्ट्राची लोककला, लावणीचा ठेका, नेत्रदीपक रोषणाई आणि दर्जेदार ध्वनियंत्रणेमुळे संपूर्ण टेंभीनाका परिसर उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघणार आहे.

Water Shortage: अरे देवा! आठवड्यात फक्त १५ मिनिटे पाणी! फायर ब्रँड खासदार-आमदारांच्या मतदारसंघात पाणीटंचाईचा कहर

ठाणे व मुंबई मानाची हंडी: प्रत्येकी रु. १ लाख ५१ हजार रोख व सन्मानचिन्ह.

महिला गोविंदा पथकः रु.१ लाख रोख पारितोषिक.

७ थरांसाठी: रु.१० हजार

६ थरांसाठी: रु. ७ हजार

५ थरांसाठी: रु.५ हजार

४ थरांसाठी: रु.४ हजार

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Thane dahi handi govinda pathak cash prize

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Dahi Handi
  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ
1

रुग्णालय की निष्काळजीपणाचा अड्डा? कळवा रुग्णालयात जेवणाच्या ताटात आढळलं झुरळ

दृष्टिहीन गोविंदांच्या जिद्दीला सलाम! दहीहंडी पथकांना लाखोंचे प्रोत्साहन; हिंदू प्राण प्रतिष्ठानच्या वतीने शिबिराचे आयोजन
2

दृष्टिहीन गोविंदांच्या जिद्दीला सलाम! दहीहंडी पथकांना लाखोंचे प्रोत्साहन; हिंदू प्राण प्रतिष्ठानच्या वतीने शिबिराचे आयोजन

ठाणे मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी; ३० हजार धावपटूंचा सहभाग, शहरातील वाहतुकीत मोठे बदल
3

ठाणे मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी; ३० हजार धावपटूंचा सहभाग, शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Thane Metro News: गायमुख-कॅडबरी जंक्शन मेट्रोला हिरवा कंदील; वर्षअखेरीस सेवा सुरू होण्याची शक्यता
4

Thane Metro News: गायमुख-कॅडबरी जंक्शन मेट्रोला हिरवा कंदील; वर्षअखेरीस सेवा सुरू होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.