Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती; नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम

Ashadhi Ekadashi Awareness Programme: आषाढी एकादशीच्या निमित्ताने न्यू कळवा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कळवा येथे जिल्हा परिषद ठाणे समाजकल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती दिंडी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 25, 2026 | 01:02 PM
ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती; नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम
Follow Us
Follow Us:
  • ठाणे जिल्ह्यात हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती
  • नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम
  • उपस्थितांना अंमली पदार्थविरोधी शपथ देण्यात आली
कळवा: नशामुक्त भारत अभियानांतर्गत आषाढी एकादशीच्या निमित्ताने गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू कळवा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कळवा (जिल्हा ठाणे) येथे जिल्हा परिषद ठाणे समाजकल्याण विभाग व नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती दिंडी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास नशामुक्त भारत अभियानाचे सदस्य तथा नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्यचे ठाणे जिल्हा समन्वयक श्री. मिलिंद रूपचंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Ashadhi Ekadashi 2026: ठाणे जिल्ह्यात आषाढी एकादशीचा उत्साह; विठ्ठल मंदिरांत विशेष पूजा, सुरक्षा व्यवस्था सज्ज

यावेळी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्यचे ठाणे जिल्हा संघटक श्री. मिलिंद पाटील यांनी “जीवनाला हो म्हणा, अंमली पदार्थांना नाही म्हणा” हा संदेश देत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन केले. “व्यसन सोडा, माणसे जोडा” हा संदेश देत “आम्ही कोणतेही व्यसन करत नाही, तुम्हीही करू नका,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. तसेच यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, युवकांमध्ये अंमली पदार्थांविरोधी मानसिकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. व्यसनामुळे आरोग्याबरोबरच शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्यातील करिअरवरही गंभीर परिणाम होतात.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांना अंमली पदार्थविरोधी शपथ देण्यात आली. त्यानंतर व्यसनमुक्ती दिंडी काढून परिसरात पुढील घोषणांद्वारे जनजागृती करण्यात आली—

“विठ्ठल विठ्ठल गजर करू, व्यसनमुक्त समाज घडवू!”
“हरिनामाचा घ्या आधार, व्यसनाला द्या नकार!”
“वारीचा संदेश घरोघरी, व्यसनमुक्ती प्रत्येक दारी!”
“व्यसनमुक्त युवक – राष्ट्राची खरी शक्ती!”
“व्यसनमुक्त भारत – हीच खरी पंढरीची वारी!”

यासोबतच व्यसनमुक्ती विषयक पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले तसेच जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय बिन्नर, ज्युनिअर कॉलेज चे उपप्राचार्य सुभाष जाधव, वरिष्ठ शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. केदारे मॅडम, श्री. शिरसाट सर, श्री. माने सर, सौ. उगलमुगले मॅडम, श्री. गवळी सर, शिक्षकेतर कर्मचारी श्री. मंचेकर सर, तसेच सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. मिलिंद पाटील यांनी सांगितले की, आषाढी एकादशीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती दिंडी, पोस्टर प्रदर्शन आणि जनजागृती पत्रकांचे वाटप करून अंमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती केली जात असून, व्यसनमुक्त समाज घडविण्याचा हा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा; बारवी धरण ५९ टक्क्यांवर, धरणसाठ्यात समाधानकारक वाढ

Web Title: Thane drug awareness rally nasha mukt bharat kalwa school anti drug campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Yatra
  • Thane news

संबंधित बातम्या

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप
1

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
2

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट
3

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
4

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.