Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल, काय आहेत नवीन वेळापत्रक?

उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.शाळेच्या नवीन वेळा काय असणार आहे, जाणून घ्या?

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 01, 2025 | 05:59 PM
उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल, काय आहेत नवीन वेळापत्रक?

उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल, काय आहेत नवीन वेळापत्रक?

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : उन्हाच्या तडाख्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आज, १ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी ०७.०० ते ११.१५ वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली तर माध्यमिक शाळांसाठी ०७.०० ते ११.४५ वेळापत्रक तयार करण्यात आल्याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी दिली आहे.

“अधिकृत वाचनालय दिसते, मात्र अनधिकृत बांधकामे ठाकरे गटाला दिसत नाहीत का?” शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टीका

राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी जिल्हा परिषद शाळाचे वेळ बदल करण्यात आले असून शिक्षक व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी?

१. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी/शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.
२. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.
३. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे.
४. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे.
५. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे.
६. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
७. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करणे.
८. उन्हात बाहेर जाताना शूज किवा चप्पल घालणे.
९. उन्हात बाहेर पडणे टाळणे.

“उन्हाची तीव्रता पाहता शनिवारच्या शाळेची वेळ बदलण्यासंदर्भात समितीचा पाठपुरावा चालू होता. विद्यार्थीहित लक्षात घेऊन शनिवारच्या शाळेच्या वेळेत वेळीच बदल करावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे तसेच खासदार सुरेश म्हात्रे यांच्या सहकार्याने हे शक्य झाले.”,अशी प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षक समिती ठाणेचे अध्यक्ष विनोद लुटे यांनी दिली आहे.

Unseasonal Rain Alert : पाच दिवस ढगाळ वातावरण; ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्याचा काय आहे हवामान अंदाज?

Web Title: Thane news thane zp school students escape from scorching summer change in zilla parishad schools timings in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • School news
  • thane
  • ZP School

संबंधित बातम्या

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर
1

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात
2

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबईत भाजप विरुद्ध भाजप? सीबीडी बेलापूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर वादाच्या भोवऱ्यात

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्
3

ठाणे स्थानक बनले मृत्यूचे केंद्र? चार वर्षांत सर्वाधिक रेल्वे अपघातांची नोंद; आकडे करतील अवाक्

Best OF Luck विद्यार्थ्यांनो! आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार
4

Best OF Luck विद्यार्थ्यांनो! आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात; १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.