Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : ठाणेकरांना वाजवी दरात मिळणार दर्जेदार हापूस; कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव होणार सुरु

 चोखंदळ आणि खवय्या ठाणेकरांचे लक्ष लागून राहिलेला १८ वा आंबा महोत्सव येत्या १ मे पासून सुरू होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 23, 2025 | 01:51 PM
Thane News : ठाणेकरांना वाजवी दरात मिळणार दर्जेदार हापूस; कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव होणार सुरु
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे / स्नेहा काकडे:   चोखंदळ आणि खवय्या ठाणेकरांचे लक्ष लागून राहिलेला १८ वा आंबा महोत्सव येत्या १ मे पासून सुरू होत आहे. आमदार संजय केळकर यांची संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंबा महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केले आहे. १ ते १२ मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात, कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच, आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे ४५ स्टॉल्स असणार आहेत. हा केवळ बाजार नसून शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारी एक चळवळ आहे. या महोत्सवात धान्याचे 5 स्टॉल असणार असून महिला बचत गटांदेखील 5 स्टॉल असणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्व नालेसफाईला सुरूवात ; पालिका आयुक्तांनी दिले आदेश

शेतकऱ्यांना हात देताना सर्वसामान्य ठाणेकरांनाही दर्जेदार हापूस आंबा विकत घेऊन त्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी ही चळवळ गेली १८वर्षे सुरू असल्याची माहिती संस्कार संस्थेचे अध्यक्ष व महोत्सवाचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कोकण पदवीधर मतदार संघातील आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमाहापौर अशोक भोईर, सुभाष काळे, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, संतोष साळुंखे, विष्णू रानडे उपस्थित होते.

१२ नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश; महाविकास आघाडीला शिंदेंचा जोरदार झटका

कोकणातील एकुण १,८०,००० हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. २०२२ साली कोकणातील आंब्याचे उत्पादन ३,२०,००० मेट्रीक टन होते. यातील २६० कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि १०० कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. दरवर्षी हे उत्पादन घटत जाऊन २०२३ मध्ये २,५६,००० मेट्रीक टन आणि २०२४ मध्ये १,२८,००० मेट्रीक टन झाले असून १२६ कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली आणि ५४ कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला.

यावर्षी अवेळी पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फळगळ झाली व थ्रीप्स रोग, तुडतुडा किटकांच्या प्रादुर्भावामुळे तीस टक्केच आंबा पीक हाती लागले आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून सातत्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. या साऱ्या परिस्थितीचा जाणकार ठाणेकर सहानुभूतीने विचार करेल व वाजवी दरातील दर्जेदार आंबा जास्तीत जास्त खरेदी करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Thane news thanekars will get quality mangoes at reasonable prices mango festival organized by konkan vikas pratishthan will begin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • raw mango
  • thane

संबंधित बातम्या

Kalwa Power Cut : “आमच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” संतप्त नागरिकांचा सवाल
1

Kalwa Power Cut : “आमच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?” संतप्त नागरिकांचा सवाल

जेवणाची चव वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची आमटी, नोट करून घ्या रेसिपी
2

जेवणाची चव वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची आमटी, नोट करून घ्या रेसिपी

तोंडाला सुटेल पाणी! जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कैरीचा मेथांबा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ
3

तोंडाला सुटेल पाणी! जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कैरीचा मेथांबा, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

आंबटगोड चवीची कच्ची कैरी खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जुनाट आजारांपासून मिळेल कायमची सुटका
4

आंबटगोड चवीची कच्ची कैरी खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जुनाट आजारांपासून मिळेल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.