Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला जुन्या काळातील जिवंत तोफगोळा आढळून आल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर मिरा-भाईंदर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीत तो अविस्फोटित स्फोटक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 11, 2026 | 04:56 PM
मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी

Follow Us
Follow Us:
  • उत्तन परिसरात खळबळ!
  • जमिनीत गाडलेला अविस्फोटित तोफगोळा आढळला
  • मिरा-भाईंदर पोलिस व एनएसजीने जिवंत तोफगोळा निकामी केला
विजय काते, भाईंदर : भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला जुन्या काळातील जिवंत तोफगोळा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मिरा-भाईंदर पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजी) यांच्या संयुक्त कारवाईत हा अविस्फोटित तोफगोळा सुरक्षितपणे निकामी करण्यात आला. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तन परिसरात नागरिकांना जमिनीत गाडलेला संशयास्पद धातूचा गोळा आढळून आला. याबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मिरा-भाईंदर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीत सदर वस्तू ही साधी धातूची नसून अविस्फोटित स्फोटक सामग्री असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

कोणताही धोका न पत्करता पोलिसांनी तत्काळ राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाशी (एनएसजी) संपर्क साधला. एनएसजीचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिसर सुरक्षा कवचाखाली घेण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास विशेष तांत्रिक प्रक्रियेचा अवलंब करून हा तोफगोळा सुरक्षितपणे निकामी करण्यात आला.

तपासादरम्यान सदर सामग्री ही अविस्फोटित स्फोटक असल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण कारवाईदरम्यान सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले असून कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. एनएसजीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षमता विकास उपक्रमांतर्गत नुकतेच मिरा-भाईंदर पोलिसांना आयईडी तसेच विविध प्रकारच्या स्फोटकांची ओळख पटविण्यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा लाभ झाल्यामुळे पोलिसांनी वेळेत धोका ओळखून योग्य ती पावले उचलली. उत्तन परिसरात आढळून आलेला हा जिवंत तोफगोळा वेळेत निकामी करण्यात आल्याने मिरा-भाईंदर शहरावर ओढवू शकणारी मोठी दुर्घटना टळली असून पोलिस व एनएसजीच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून ही मोहीम फत्ते करण्यात आली. क्षमता विकास उपक्रमांतर्गत नुकतेच मीरा-भाईंदर पोलिसांना आयईडी आणि विविध प्रकारच्या स्फोटकांची ओळख पटवण्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते, अशी माहिती एनएसजी अधिकाऱ्यांनी दिली.

बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

Web Title: Uttan bhayander unexploded shell found nsg police defuse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • crime
  • Mira Bhayander
  • police

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.