Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

Buldhana Sanjay Gaikwad on Motala Water Shortage: बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 18, 2026 | 07:44 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • मोताळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी मोठी तयारी
  • धरणांतील पाणीसाठ्याचा घेतला आढावा
  • संजय गायकवाडांचे पाणी नियोजनाचे आदेश

बुलढाणा: आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच तालुक्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे, या उद्देशाने बुधवारी मोताळा तहसील कार्यालयात पाणीटंचाई नियोजन व आढावा सभा पार पडली. आमदार संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

शासन निर्णयांतील मार्गदर्शक महाराष्ट्र शासनाच्या २५ सप्टेंबर आणि ५ ऑक्टोबर रोजीच्या सूचनांनुसार या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी, मोताळा तहसीलदार सरिता पाटील, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी, सरपंच, प्रशासक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सभेदरम्यान मोताळा तालुक्यातील नळगंगा, पलढग, राहेरा आणि कापूसवाडी या प्रमुख धरणांसह इतर लघु व मध्यम प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून आगामी उन्हाळ्यात तसेच पुढील अकरा महिन्यांच्या कालावधीत, म्हणजेच ऑक्टोबर २०२७ पर्यंत, नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, अशा पद्धतीने पाणी आरक्षण व वितरणाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

Mumbai Ayodhya Special Train 2026 : मध्य रेल्वेचा स्वच्छता पंधरवाडा उत्साहात संपन्न

उपलब्ध पाणीसाठ्यातून सर्वप्रथम नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण निश्चित करण्यावर भर देण्यात आला. पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांची दुरुस्ती, अनधिकृत पाणीउपसा रोखणे आणि पाणीवाटपात समतोल राखणे याबाबतही चर्चा करण्यात आली. संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करणे, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी मंजुरी घेणे, विहिरींचे अधिग्रहण करणे आणि बंद पडलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

शासन निर्णयातील तरतुदींनुसार तालुकास्तरावर पाणीटंचाई लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांमध्ये निवारण व सनियंत्रण समिती गठित करून ठेवण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. महसूल, ग्रामीण ण पाणीपुरवठा, पाटबंधारे आणि नियमित शासकीय समन्वय विभाग, महावितरण आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करून टंचाई निवारणाची कामे विनाविलंब पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले.

नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसू नये

सभेचे अध्यक्ष आ. संजय गायकवाड यांनी संबंधित यंत्रणांना पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले. शासनाच्या २५ सप्टेंबर व ५ ऑक्टोबर रोजीच्या निर्णयानुसार नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी आणि तालुक्यातील कोणात्याही नागरिकाला पाणीटंचाईची झळ बसणार नाही. याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले, आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सज्ज राहून उपलब्ध पाणीसाठ्बाचे काटेकोर नियोजन करावे, तसेच पाणीपुरवतचाशी संबंधित समस्या वेळेत निकाली काढण्यात्, यावर या सभेत विशेष भर देण्यात आला.

Washim: चारा लागवड मोहीम प्रभावीपणे राबवा, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; व्यवस्थापनाचा आढावा

Web Title: Sanjay gaikwad action on buldhana motala water shortage planning pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • buldhana news
  • Sanjay Gaikwad
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
1

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन
2

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन

Buldhana: खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे जतन करा; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन
3

Buldhana: खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे जतन करा; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन

Buldhana: दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन; १० हजारांहून अधिक कामांचे नियोजन
4

Buldhana: दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन; १० हजारांहून अधिक कामांचे नियोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.