Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाणेकरांनो आरोग्य तपासणी करुन घ्या, पालिकेचं नागरिकांना आवाहन; महिला व बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर

स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण हे आपल्या कुटुंबांचे, समाजाचे आणि अखेरीस संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू असतो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 16, 2025 | 06:48 PM
ठाणेकरांनो आरोग्य तपासणी करुन घ्या, पालिकेचं नागरिकांना आवाहन; महिला व बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/स्नेहा जाधव,काकडे: आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या अभियानाअंर्तगत ठाणे महापालिकेतर्फे महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या काळात राबवण्यात येणाऱ्या या अभियानाची ठाण्यातील सुरूवात बुधवार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून वर्तकनगर येथील लोकमान्य टिळक नर्सिंग होम (कोरस रुग्णालय) येथून होणार आहे.

स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण हे आपल्या कुटुंबांचे, समाजाचे आणि अखेरीस संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू असतो. त्या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ बुधवार, 17 सप्टेंबर रोजी इंदौर, मध्य प्रदेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या समारंभाचे थेट प्रक्षेपण लोकमान्य टिळक नर्सिंग होम, कोरस रुग्णालय येथे करण्यात येणार असून त्यास लोकप्रतिनिधी, डॉक्टर, आरोग्यसेविका आदी उपस्थित राहणार आहेत.

Thane News : वाहतूक कोंडीवर काढला तोडगा? घोडबंदर रहिवाशांना मिळणार दिलासा; एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश

महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात शिबिरे

ठाणे महापालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत होणाऱ्या आरोग्य शिबिरांमध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, ह्दयरोग आदी असंसर्गजन्य रोगांचे तपासणी शिबीर, नेत्र तपासणी, दंत तपासणी, माता व बाल आरोग्य शिबीर, महिला व बालकांसाठी पोषण जागरुकता सत्रे, आयुष आणि योग शिबिरे, क्षयरोग जागरुकता आणि तपासणी शिबिरे, रक्तदान शिबीर, अवयवदान प्रतिज्ञा, मोफत औषध वितरण, मानसिक आरोग्य समुपदेशन, व्यसनमुक्ती शिबीर, किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी रक्तक्षय तपासणी आणि समुपदेशन, क्षयरोग तपासणी, सिकलसेल रोग तपासणी यांचे आयोजन सर्व नागरी केंद्र येथे करण्यात येणार आहे.

महिला व बालक यांना लाभ घेण्याचे आवाहन

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात होणाऱ्या आरोग्य शिबिराचा लाभ शहरातील सर्व महिला तसेच गरोदर माता व सर्व लहान बालकांन होणार असून त्याचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

राज्याला मुसळधार पावसाने झोडपले; मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र अतिमुसळधार पाऊस, आता पुढील 48 तास…

Web Title: Thanekars get a health check up the municipality appeals to the citizens free health camp for women and children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 06:48 PM

Topics:  

  • Marathi News
  • muncipal corporation
  • Thane news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार
1

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध
2

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला  पाककला स्पर्धेचे खास आकर्षण
3

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला पाककला स्पर्धेचे खास आकर्षण

पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद
4

पिंपरीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज प्रचार! प्रभाग १९ मध्ये उमेदवारांचा घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.