Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासदार प्रणिती शिंदेंच्या पाठपुराव्याला यश, उजनीतून भीमा नदीत पाणी सुटणार; मोहोळसह पाच तालुक्यांना मोठा दिलासा!

सोलापूर जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 19, 2026 | 01:03 PM
खासदार प्रणिती शिंदेंच्या पाठपुराव्याला यश, उजनीतून भीमा नदीत पाणी सुटणार; मोहोळसह पाच तालुक्यांना मोठा दिलासा!

खासदार प्रणिती शिंदेंच्या पाठपुराव्याला यश, उजनीतून भीमा नदीत पाणी सुटणार; मोहोळसह पाच तालुक्यांना मोठा दिलासा!

Follow Us
Follow Us:

​मोहोळ : सोलापूर जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, यामुळे उन्हाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीसाठी लागणारी पाण्याची निकड लक्षात घेता, खासदार शिंदे यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) अधीक्षक अभियंत्यांकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती.

 

भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ​मोहोळ तालुक्यातून भीमा नदीचे विस्तीर्ण पात्र जाते. या नदीकाठच्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना आणि शेती पूर्णतः नदीवर अवलंबून आहे. पाणी सुटल्यामुळे मोहोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना तसेच पिकांना संजीवनी मिळणार आहे. यामध्ये मोहोळ सह मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांमधील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

​वाढत्या तापमानामुळे भीमा नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे ठाक पडले होते. यामुळे उभी पिके जळून जाण्याची भीती निर्माण झाली होती, तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला होता. स्थानिक शेतकऱ्यांनी आपली व्यथा खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मांडली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी प्रशासनावर दबाव निर्माण केला आणि तातडीने पाणी सोडण्यास भाग पाडले.

​”शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, ही आमची प्राथमिकता होती. प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच नदीपात्रात पाणी पोहोचेल.” —खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर.

​उजनीतून पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे मोहोळसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः बागायतदार शेतकरी आणि पशुपालकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून प्रशासनाकडे आता हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्याची मागणी केली आहे.

​”पाणी सोडण्याचा निर्णय अधिकृत प्रक्रियेतून झाला आहे. खासदार प्रणिती शिंदेंनी जनहितासाठी पाठपुरावा केला, तर दुसरीकडे स्वतःच्या कारखान्याचा ऊस वाचवण्यासाठी धडपडणारे आता फुकटचे श्रेय लाटत आहेत. हा यातील मोठा फरक आहे.” ​— सुलेमान तांबोळी (अध्यक्ष, काँग्रेस (आय) मोहोळ तालुका)

Web Title: The administration has taken an important decision to release water from ujni dam into the bhima river basin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Farmers
  • MP Praniti Shinde
  • Ujani Dam

संबंधित बातम्या

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
1

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
2

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?
3

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?

पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा
4

पिके करपली, शेतकरी संकटात; इंदापुर तालुक्यात कृषिमंत्री भरणेंनी घेतला नुकसानीचा आढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.