Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला काढणार ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’

काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ आयोजित केली असून, सोमवारी ३० मार्च रोजी धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर अशी पदयात्रा निघणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 29, 2026 | 11:58 AM
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस आक्रमक; 'या' तारखेला काढणार ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस आक्रमक; 'या' तारखेला काढणार ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’

Follow Us
Follow Us:

मुंबई : काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ आयोजित केली असून, सोमवारी ३० मार्च रोजी धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर अशी पदयात्रा निघणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या संघर्ष यात्रेत पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व शेतकरी सहभागी होणार आहेत. पदयात्रेची सुरुवात सोलापूर तुळजापूर महामार्गावरील सुरतगाव येथून सकाळी ८ वाजता होणार असून, संध्याकाळी ५ वाजता तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे.

भाजपा सरकारच्या उद्योगपतीधार्जिण्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या भाजपा सरकारच्या वल्गना हवेतच विरल्या आहेत.भाजपा सरकार एमएसपीचा कायदाही करत नाही. हमीभावापेक्षा कमी भाव देणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या घोषणाही भाजपा सरकारने केल्या पण त्याही कागदावरच राहिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे, तर मोदी सरकारने अमेरिकेबरोबर व्यापारी करार करून शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस संसद, विधिमंडळ व रस्त्यावरही लढत असून, या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केले आहे.

हे सुद्धा वाचा : …तर डझनभर मंत्री आणि दोन डझन अधिकारी जेलमध्ये जातील; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

हर्षवर्धन सपकाळांचा संतप्त सवाल

दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होते, मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते का?, असा संतप्त सवाल उपस्थित करून खरात प्रकरणाने जी विकृत चर्चा सुरु आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही. एसआयटीला अधिकची कुमक द्या, टास्क फोर्स लावा आणि दोषींना गजाआड करून या खरात प्रकरणाचा शेवट करा, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला आहे पण इतर सर्व संबंधितांचे काय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे. खरातशी संबंधित असलेल्यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.

Web Title: The congress party has taken an aggressive stance on farmers issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • MP Rahul Gandhi
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
3

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
4

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.