Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२७ गावातील अंधारात असलेले रस्ते येणार उजेडात, आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांतील रस्त्यावर अंधार असल्याने नागरिकांकडून पथदिवे बसविण्याची मागणी झाली होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 17, 2024 | 11:05 AM
२७ गावातील अंधारात असलेले रस्ते येणार उजेडात, आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात असलेल्या २७ गावातील रस्त्याच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असून काम देखील सुरु आहेत. मात्र रस्त्यांवर रात्रीचा अंधार असल्याने रस्त्याच्या कडेला पथदिवे बसविण्याची मागणी नगरविकास विभागाकडे केली होती. त्यानंतर तातडीने शासनाच्या नगर विकास विभागाकडून २७.९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने २७ गावातील अंधारात असलेले रस्ते लवकरच उजेडात येणार आहेत. या पथदिव्यांसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर तातडीने या रस्त्याच्या कडेला पथदिवे बनवण्यासाठी नगरविकास खात्याने निधीची उपलब्धता करून दिली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांतील रस्त्यावर अंधार असल्याने नागरिकांकडून पथदिवे बसविण्याची मागणी झाली होती. यानुसार स्थानिक आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे २७ गावांमध्ये पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. परंतु महानगरपालिकेकडे निधी नसल्यामुळे त्यांची अडचण झाली होती. यानंतर आमदार राजू पाटील यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता.

नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नुकत्याच वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत त्यांना विनंती केली होती व त्यानंतर हा २७. ९० कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. गेली अनेक वर्ष अंधारात असलेल्या या गावांमध्ये दिवाबत्तीची व्यवस्था आता मार्गी लागणार आहे. त्यामुळे २७ गावातील रस्ते आता प्रकाशझोतात येणार आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्याने हा निधी मंजूर झाल्याने नागरिकांकडून देखील आनंद व्यक्त आला आहे.

Web Title: The dark roads of 27 villages will be lit up the pursuit of mla raju patil is a success kalyan dombivli municipality maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2024 | 11:05 AM

Topics:  

  • kalyan
  • Maharashtra Government
  • MLA Raju Patil

संबंधित बातम्या

मार्कशिट आणि सर्टिफिकेट्सची आता मिळणार एकच प्रत; हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा
1

मार्कशिट आणि सर्टिफिकेट्सची आता मिळणार एकच प्रत; हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा

Kalyan : सुप्रिया सोसायटी ते वाणी विद्यालय रस्ता होणार मजबूत, नागरिकांना दिलासा
2

Kalyan : सुप्रिया सोसायटी ते वाणी विद्यालय रस्ता होणार मजबूत, नागरिकांना दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.