Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : दरीत अडकून पडला कुत्रा अन् सलग तीन दिवस… ; सह्याद्री ट्रेकर्सने ‘असं’ केलं रेस्क्यू

माथेरान या पर्यटन स्थळी असलेल्या एको पॉईंटजवळील खोल दरीजवळून भटकंती करणारा कुत्रा दारूत कोसळला होता.हा कुत्रा त्या दरीत कोसळत असताना तो जंगलातील एका झाडाला अडकला होता. त्याच्या या सुटकेचा थरार अंगावर काटा आणणारा आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 23, 2025 | 03:47 PM
Matheran News : दरीत अडकून पडला कुत्रा अन् सलग तीन दिवस… ; सह्याद्री ट्रेकर्सने ‘असं’ केलं रेस्क्यू
Follow Us
Close
Follow Us:

माथेरान/ संतोष पेरणे : येथील एको पॉईंट येथील दरीत एक कुत्रा तीन दिवस आधी कोसळला होता.दरीत कोसळत असताना तेथील एका झाडाला अडकून पडलेला हा मुका प्राणी तीन दिवस पावसात भिजल्याने ओरडत होता.मात्र त्या मुक्या प्राण्याला सह्याद्री आपदा संस्थेचे सदस्यांनी त्या कुत्र्याला जिवंत बाहेर काढले आणि या आपदा संस्थेच्या कार्याचे कौतुक होत आहे.

माथेरान या पर्यटन स्थळी असलेल्या एको पॉईंटजवळील खोल दरीजवळून भटकंती करणारा कुत्रा दारूत कोसळला होता.हा कुत्रा त्या दरीत कोसळत असताना तो जंगलातील एका झाडाला अडकला.सध्याच्या पावसामुळे निसरड्या झालेल्या जमिनीवर गवताळ भागात पाय घसरत तो एका अतिशय धोकादायक मधल्या टप्प्यावर जाऊन थांबला. दरीचे कड्यालगत असलेल्या त्या भागातून ना तो वर चढू शकत होता ना खाली उतरू शकत होता.

Thane News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका; सावध राहा, सुरक्षित रहा! जिल्हाधिकाऱ्यांच नागरिकांना आवाहन

पावसामुळे जमीन निसरडी झाली होती आणि आजूबाजूला मृत्यू दरीत सापडला होता.सलग तीन दिवस हा मुका प्राणी पावसात भिजत होता आणि त्यावेळी कोणत्याही प्रकारचे खाद्य मिळत नसल्याने विव्हळत होता.सोमवार पासून माथेरान मध्ये प्रचंड पाऊस सुरू असताना भर पावसात थरथरत झाडाच्या फांद्यात अडकून पडलेला हा मुका प्राणी बचावासाठी भुंकून मदत मागत होता. हा मुका प्राणी हा जीव दोन दिवस उपाशीपोटी, थरथरत, जीव मुठीत धरून तसाच उभा होता. पावसाची धार, थंडी, भूक आणि एकटेपणाचं भय हे सर्व हा मुका प्राणी अनुभवत होता.

याबाबतची माहिती स्थानिक एको पॉइंट नागरिकांनी  दिली. ही बाब माथेरान मधील सह्याद्री आपदा संस्थेला मिळाली आणि त्यांनी आज रेस्क्यू करण्यास सुरुवात केली.या आपदा संस्थेचे सदस्य वैभव नाईक,उमेश मोरे,सुनील ढोले,चेतन कळंबे या सर्वांनी हवामानाची तमा न बाळगता आणि सुरक्षेची पूर्ण काळजी घेत त्या कठीण भागात उतरून या कुत्र्याला रेस्क्यू यशस्वी केले.अत्यंत जोखमीचा आणि जीव धोक्यात घालणारा हा प्रयत्न यशस्वी झाला आणि कुत्र्याला सुखरूपपणे दरी बाहेर काढण्यात आले.आपदा संस्थेचे या कार्याबद्दल कौतुक करण्यात येत असून तो मुका जीव जिवंत असून दरी बाहेर आल्यानंतर हा कुत्रा शांतपणे उभा राहिल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य व्यक्त होत आहे.

Dombivli MIDC Fire : डोंबिवली MIDC तील कपड्याच्या कारखान्याला भीषण आग

Web Title: The dog fell into the valley at point three days ago and was fortunately rescued by trekkers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 03:47 PM

Topics:  

  • karjat news
  • latest news
  • Marathi News
  • matheran news

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
1

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
2

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.