लठ्ठपणामुळे काय त्रास होतो (फोटो सौजन्य - iStock)
भारतात लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ती चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे लठ्ठपणा हा फक्त शरीराचे वजन वाढणे किंवा दिसण्याशी संबंधित समस्या नसून तो एक गंभीर आरोग्य समस्या आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. लठ्ठपणाचा परिणाम शरीरातील अनेक अवयवांवर होतो. आजकाल लोकांची जीवनशैली अधिक बसून राहण्याची झाली आहे, व्यायाम कमी झाला आहे, ताणतणाव वाढला आहे आणि जंक फूडचे सेवन जास्त झाले आहे. या सर्व कारणांमुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. डॉ. अपर्णा गोविल भास्कर, बॅरिएट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. लठ्ठपणामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या कोणत्या आहेत जाणून घेऊया
Obesity Issue: जास्त वजन आहे? नियमित आरोग्य तपासणी का गरजेची, शरीर आतून पोखरतंय; गंभीर परिणाम
मधुमेह:
लठ्ठपणा म्हणजे शरीरात जास्त प्रमाणात चरबी साठणे. यामुळे शरीर इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो. जर मधुमेह नियंत्रणात ठेवला नाही, तर त्याचा परिणाम हृदय, नस, डोळे आणि मूत्रपिंडांवर होऊ शकतो.
उच्च रक्तदाब:
शरीराचे वजन जास्त असल्यास हृदयाला शरीरात रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव वाढतो आणि उच्च रक्तदाब होतो. जर उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही, तर हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या स्थितीकडे दुर्लक्ष करू नये.
मूत्रपिंडांचे नुकसान:
जास्त वजनामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढते. या दोन्ही समस्या पुढे जाऊन दीर्घकालीन मूत्रपिंड विकारांना कारणीभूत ठरू शकतात. जास्त वजनामुळे मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे शरीरातील घातक पदार्थ फिल्टर करण्याची त्यांची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे मूत्रपिंडांचे आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे आहे.
फॅटी लिव्हर रोग:
लठ्ठपणा असलेल्या अनेक लोकांच्या यकृतात जास्त प्रमाणात चरबी साठते. यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होऊ शकतो. सुरुवातीला याची कोणतीही ठळक लक्षणे दिसत नाहीत. पण कालांतराने यामुळे यकृतामध्ये सूज येऊ शकते, जखमा तयार होऊ शकतात आणि गंभीर परिस्थितीत लिव्हर फेल्युअर देखील होऊ शकते.
नियंत्रणासाठी काय करावे?






