Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल ‘स्ट्रक्चरली’ सुरक्षित; अफवांना पूर्णविराम

गेल्या काही दिवसांपासून या उड्डाणपुलाच्या सांध्यांमध्ये (जॉइंट्स) दोष असल्याचा दावा करणारा एक फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 14, 2026 | 01:06 PM
Akola News : रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु; दर्यापूर मार्ग झाला ठप्प

Akola News : रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु; दर्यापूर मार्ग झाला ठप्प

Follow Us
Follow Us:

पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या बाणेर रॅम्पबाबत समाजमाध्यमांवर पसरलेल्या शंकांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या उड्डाणपुलाच्या संरचनेत कोणतीही तांत्रिक त्रुटी नसून तो वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाने दिला आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी सर्व आवश्यक तांत्रिक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून हा पूल तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित व सक्षम असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून या उड्डाणपुलाच्या सांध्यांमध्ये (जॉइंट्स) दोष असल्याचा दावा करणारा एक फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक सनी निम्हण यांनीही पुलाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच, या कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक ऑडिट करण्याबाबत महानगर आयुक्तांना पत्र दिले होते.

या चर्चेनंतर पीएमआरडीएच्या अभियंत्यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. तपासणीनंतर प्रशासनाने स्पष्ट केले की, व्हायरल फोटोमध्ये दिसणारा भाग हा पुलाचा मुख्य संरचनात्मक घटक नसून तो केवळ बाहेरील क्रॅश बॅरियरच्या फिनिशिंग आणि रंगकामाशी संबंधित आहे. त्यामुळे या बाबीचा पुलाच्या मजबुती किंवा सुरक्षिततेशी कोणताही संबंध नाही.

पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा उड्डाणपूल ‘प्री-स्ट्रेस्ड सेगमेंटल’ तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आला आहे. या पद्धतीमध्ये विशेष केबल्सच्या साहाय्याने पुलाचा मुख्य भार सांभाळला जातो. त्यामुळे सांध्यांमधील किरकोळ फिनिशिंगचा पुलाच्या आयुष्यावर किंवा सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होत नाही.

“बाणेर रॅम्पच्या संरचनेत कोणताही दोष नाही. जे त्रुटी असल्याचे दिसत आहे, ते केवळ सौंदर्यीकरणाशी संबंधित आहेत. संबंधित ठेकेदार कंपनीला उर्वरित किरकोळ काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” असेही पीएमआरडीएने स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता उड्डाणपुलाचा निर्धास्तपणे वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

हेदेखील वाचा : Pune News: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान स्पर्धां’चे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार अनोखा अनुभव

Web Title: The flyover at university square is structurally safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Pimpri News
  • pune news
  • Savitribai Phule Pune University

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
3

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
4

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.