Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्नाळ्याच्या वनराईत ‘स्वर्गीय नर्तकाचे’ आगमन! लांबसडक शेपटीसह निळसर तुऱ्याने सजलेला पक्षी

झाडांच्या फांद्यांवर विसावलेला किंवा हवेत लहरी घेत उडणारा हा पक्षी पाहताना जणू स्वर्गीय सौंदर्य पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो.नर पक्ष्याची लांब, रेशमी शेपटी आणि पांढरा अथवा तांबूस-तपकिरी रंग त्याची खास ओळख आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 19, 2026 | 02:13 PM
कर्नाळ्याच्या वनराईत 'स्वर्गीय नर्तकाचे' आगमन! लांबसडक शेपटीसह निळसर तुऱ्याने सजलेला पक्षी

कर्नाळ्याच्या वनराईत 'स्वर्गीय नर्तकाचे' आगमन! लांबसडक शेपटीसह निळसर तुऱ्याने सजलेला पक्षी

Follow Us
Follow Us:

कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि परिसरातील हिरवीगार वनराई सध्या एका अलौकिक सौंदर्याच्या साक्षीदार ठरत आहे. निसर्गाच्या कुंचल्यातून जणू काही पांढरी शुभ्र लाट साकारावी, असा देखणा ‘इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर’ अर्थातच ‘स्वर्गीय नर्तक’ यंदा मोठ्या संख्येने या भागात दाखल झाला आहे. आपल्या मखमली शुभ्र पांढऱ्या आणि तपकिरी छटेच्या लांबसडक शेपटीसह, निळसर तुऱ्याने सजलेला हा पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले कर्नाळ्याकडे वळत आहेत. पुणे मुंबई महामार्गालगत आणि दोन्ही शहरापासून जवळ असल्यामुळे येथे पर्यटक, पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने भेट देतात. दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम कर्नाळा अभयारण्यात असतो.(फोटो सौजन्य – istock)

पोलिस प्रशासनासह निवडणूक अधिकाऱ्यांचा लागणार कस; निवडणूक काळातच असणार पुरंदर तालुक्यातील वीरची यात्रा

मात्र यंदाचे दृश्य काहीसे वेगळे आणि अधिक सुखावह असल्याचे चित्र आहे. कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या कल्हे गावाच्या शिवारात ‘स्वर्गीय ) नर्तका’चा वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. झाडांच्या फांद्यांवर विसावलेला किंवा हवेत लहरी घेत उडणारा हा पक्षी पाहताना जणू स्वर्गीय सौंदर्य पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. नुकतेच या भागात या पक्ष्याची नयनरम्य दृश्ये वन्यजीव छायाचित्रकार विवेक आंबेरकर यांनी टिपली आहेत.त्यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितले की, “एखाद्या पांढऱ्या शुभ्र फितीप्रमाणे हवेत लहरी घेत उडणारा हा पक्षी पाहणे, हा केवळ निसर्गदर्शन नसून ध्यानाचा अनुभव असतो. कल्हे गावाजवळ ज्या पद्धतीने या पक्ष्यांचे दर्शन होत आहे, ते पाहता निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि पक्षी अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी आहे.”

स्थानिक ग्रामस्थांच्या मते, यावर्षी कर्नाळा अभयारण्य आणि लगतच्या जंगल परिसरात पक्ष्यांची संख्या आणि विविधता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. केवळ ‘स्वर्गीय नर्तक’च नव्हे, तर अनेक दुर्मिळ पक्षी यंदा मोठ्या संख्येने दर्शन देत आहेत. वाढलेली वनराई, जंगलातील शांत वातावरण आणि मानवी हस्तक्षेपात झालेली घट यामुळे या पक्ष्यांचा मुक्काम अधिक सुरक्षित व सुखकर झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. कर्नाळ्याच्या वनराईत सध्या सुरू हा असलेला पक्षीवैभवाचा उत्सव निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरत असून, भविष्यातही या जैवविविधतेचे जतन व्हावे, अशी अपेक्षा निसर्गप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.

शिक्षकांच्या बदलीचा मुहूर्त गवसला! राज्यातील जि.प.च्या १२ हजार शिक्षकाचा समावेश, ग्राम विकास विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर

स्वर्गपक्षाविषयी थोडक्यात….

हा जंगलातील सर्वात देखण्या पक्ष्यांपैकी एक मानला जातो. नर पक्ष्याची लांब, रेशमी शेपटी आणि पांढरा अथवा तांबूस-तपकिरी रंग त्याची खास ओळख आहे, तर मादीचा रंग तुलनेने साधा असतो. डोळ्याभोवती दिसणारी निळसर कडा हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हा पक्षी दाट जंगल, पानगळीची वनराई, बागा असलेल्या भागात आढळतो. कीटकभक्षी असलेला स्वर्गपक्षी हवेत उडणारे कीटक अचूकतेने टिपतो. एप्रिल ते जुलैदरम्यान याचा प्रजननकाळ असतो. सध्या हा पक्षी ‘धोक्यात नसलेला’ असला तरी जंगलतोड आणि अधिवास नष्ट होणे यामुळे काही भागांत त्यांची संख्या कमी होत आहे. त्यांच्या प्रजातींचे रक्षण आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The heavenly dancer arrives in the forests of karnala a bird adorned with a long tail and a bluish crest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • birds
  • lifestlye tips
  • maharashra

संबंधित बातम्या

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर
1

APL Blood Cancer: ताप गेला पण रक्तात गडबड कायम, तपासणी केली तर निघाला दुर्मिळ रक्ताचा कॅन्सर

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा
2

Diabetic Retinopathy: दिसतंय म्हणून डोळे निरोगी आहेत असं समजू नका! रेटिनाच्या आजाराचा धोका ओळखा

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा
3

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका
4

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.