फोटो सौजन्य - Social Media
यावेळी कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा यांनी धरणाची जलसाठा क्षमता, सुरू असलेली कामे, भूसंपादन, पुनर्वसन, कालव्यांच्या उभारणीची प्रगती तसेच प्रकल्प पूर्णत्वासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. प्रकल्पाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावरही चर्चा झाली.
धरण परिसराची पाहणी करताना सावकारे यांनी भूसंपादन व पुनर्वसनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पुनर्वसनासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्याबरोबरच सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
संत सोपानकाका महाराज पालखीत मेंढ्याचे रिंगण; शेतकरी-मेंढपाळांनी जपली पारंपरिक वारीची परंपरा
जिगाव धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असून कृषी उत्पादनात वाढ, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करत प्रशासनाने समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असे आवाहन संजय सावकारे यांनी केले.






