Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रीम कोर्टाकडून शिंदेसेनेच्या नेत्याला मोठा धक्का, थेट आमदारकी धोक्यात; नेमकं प्रकरण काय?

संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडीत सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) फेटाळून लावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 30, 2026 | 06:31 PM
सुप्रीम कोर्टाकडून शिंदेसेनेच्या नेत्याला मोठा धक्का, थेट आमदारकी धोक्यात; नेमकं प्रकरण काय?

सुप्रीम कोर्टाकडून शिंदेसेनेच्या नेत्याला मोठा धक्का, थेट आमदारकी धोक्यात; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

मुंबई : संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडीत सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) फेटाळून लावली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवरील नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रामध्ये शासकीय कराची थकबाकी तसेच ‘नीलकमल’ भागीदारी संस्थेतील भागीदार असल्याची माहिती जाणीवपूर्वक लपवली. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन अवैध ठरवून त्यांची निवड रद्द करावी आणि बाळासाहेब थोरात यांना विजयी घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या याचिकेला विरोध करत अमोल खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून निवडणूक याचिका चालविण्यास कोणतेही वैध कारण (Cause of Action) नसल्याचा युक्तिवाद केला होता. त्यामुळे याचिका प्रारंभीच फेटाळून लावावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत निवडणूक याचिका सुनावणीस पात्र असल्याचे स्पष्ट केले.

या आदेशाविरोधात अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. शासकीय कराची थकबाकी अत्यल्प असल्याने ती निवडणूक याचिकेचा आधार ठरू शकत नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत, शासकीय देयकाची रक्कम कितीही कमी असली, अगदी एक रुपयाची असली तरी ती निवडणूक शपथपत्रात नमूद करणे बंधनकारक आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले.

हे सुद्धा वाचा : चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ अन्…; पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या तीन संतापजनक घटना

या निर्णयामुळे आता मुंबई उच्च न्यायालयात मूळ निवडणूक याचिकेवरील सुनावणी पुढे सुरू राहणार असून, अमोल खताळ यांची निवड रद्द करून बाळासाहेब थोरात यांना विजयी घोषित करण्याच्या मागणीवर अंतिम निर्णय उच्च न्यायालय घेणार असल्याची माहिती ॲड. अमित करंडे यांनी दिली. बाळासाहेब थोरात यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मुकुल रोहतगी यांच्यासह ॲड. शिवाजी जाधव आणि ॲड. अमित करंडे यांनी बाजू मांडली.

हे सुद्धा वाचा : केपीआयटीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, महसुलात वार्षिक ८.९ टक्के वाढ; २५७ दशलक्ष अमेरिकी डॉलरचे नवे करार

Web Title: The supreme court has dismissed the petition filed by mla amol khatal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Balasaheb Thorat
  • Eknath Shinde
  • maharashtra

संबंधित बातम्या

Baramati ATM Theft: महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १४ लाख १९ हजारांची रोकड लंपास
1

Baramati ATM Theft: महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १४ लाख १९ हजारांची रोकड लंपास

ठाण्याच्या विकासाला नवी गती! जागतिक दर्जाचा वॉटरफ्रंट प्रकल्प उभारणार; तब्बल 50 एकरांहून अधिक क्षेत्रात…
2

ठाण्याच्या विकासाला नवी गती! जागतिक दर्जाचा वॉटरफ्रंट प्रकल्प उभारणार; तब्बल 50 एकरांहून अधिक क्षेत्रात…

Neral News: मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ₹4.78 लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Neral News: मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ₹4.78 लाखांचा मुद्देमाल जप्त

केपीआयटीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, महसुलात वार्षिक ८.९ टक्के वाढ; २५७ दशलक्ष अमेरिकी डॉलरचे नवे करार
4

केपीआयटीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, महसुलात वार्षिक ८.९ टक्के वाढ; २५७ दशलक्ष अमेरिकी डॉलरचे नवे करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.