• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Voting Percentage Has Decreased In The Tasgaon Municipal Elections

तासगावात मतदानाचा घटलेला टक्का कोणाचे गणित बिघडवणार? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

तासगाव नगरपालिका निवडणुकीत मंगळवारी झालेल्या मतदानात ७०.४६ टक्क्यांची नोंद झाली असून, गत निवडणुकीच्या तुलनेत टक्केवारी घटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 04, 2025 | 01:01 PM
तासगावात मतदानाचा घटलेला टक्का कोणाचे गणित बिघडवणार? कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • तासगावात मतदानाचा टक्का घटला
  • कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमांचे वातावरण
  • प्रतिष्ठेच्या लढतीत कोण जिंकणार?
तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणुकीत मंगळवारी झालेल्या मतदानात ७०.४६ टक्क्यांची नोंद झाली असून, गत निवडणुकीच्या तुलनेत टक्केवारी घटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मतदानाची अधिकृत अंतिम आकडेवारी रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हती; मात्र घटलेला टक्का कोणाच्या बाजूने झुकेल आणि कोणाला धक्का देईल? या प्रश्नावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

नगराध्यक्षपदासाठी ५ उमेदवार आणि २४ नगरसेवकांसाठी तब्बल ८८ उमेदवार रिंगणात असल्याने स्पर्धा चुरशीची होती. सकाळी साडेसातला मतदानास सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत अवघे १० टक्के मतदान झाले. दुपारी अडीच–तीनच्या सुमारास टक्केवारी जलद वाढत ५४ वर पोहोचली. संध्याकाळी मतदानाची वेळ संपत आली तरी अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा कायम होत्या. ३२,९९४ पैकी २३,२४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रभाग १२ मधील केंद्र क्र. ३ वर सर्वाधिक ८० टक्के मतदान झाले, तर प्रभाग ३ मधील केंद्र क्र. ३ अवघ्या ५४ टक्क्यांसह तळाशी राहिले.

प्रतिष्ठेच्या लढतीत कोण जिंकणार?

या निवडणुकीत तासगावातील राजकीय समीकरणे आगळीवेगळी होती. आमदार रोहित पाटील यांची नगरपालिकेवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी, तर माजी खासदार संजय पाटील यांची सत्ता टिकवण्यासाठी ही प्रतिष्ठा पणाला लागली. दोघांनीही अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न केले. या दोघांच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वतंत्र पॅनेल उभे करून पर्यायाचा दावा मांडला. राष्ट्रवादी अजित पवार गटही निवडणुकीच्या मैदानात उतरला होता.

मतदान घटल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

मतदान कमी झाल्याने दोन्ही प्रमुख गटांतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. घटलेला मतदानाचा टक्का साधारणपणे ठाम मतदारसंख्या असलेल्या गटाला लाभदायी, तर विस्तृत पण ढिल्या आधाराच्या पक्षाला तोट्याचा ठरतो, असा अनुभव आहे. तथापि, तासगावातील प्रस्थापित नेते, बंडखोरी आणि भाजपाचे स्वतंत्र पॅनेल या तिन्ही गोष्टींमुळे समीकरणे पूर्वीसारखी सरळ न राहता अत्यंत गुंतागुंतीची बनली आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निकालापूर्वी कोणाच्या दिशेने जनमत झुकले आहे, हे सांगणे अवघड झाले आहे.

आता डोळे मतमोजणीकडे

मतदानाचा टक्का कमी असला तरी स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. कोणाला जनतेने पसंती दिली आणि कोणाचे गणित चुकले याचा फैसला मतमोजणीच्या दिवशीच होणार आहे. तासगावची राजकीय हवा कोणत्या दिशेने वाहतेय, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Web Title: The voting percentage has decreased in the tasgaon municipal elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • Rohit Patil
  • sanjay patil
  • Tasgaon News

संबंधित बातम्या

तासगाव–कवठेमहांकाळच्या शाश्वत विकासाचा ‘वचननामा’ प्रसिद्ध; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा जाहीर
1

तासगाव–कवठेमहांकाळच्या शाश्वत विकासाचा ‘वचननामा’ प्रसिद्ध; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा जाहीर

अफवांना थारा देऊ नका, संघटनात्मक ताकदीवरच…; आमदार रोहित पाटील यांचा निर्धार
2

अफवांना थारा देऊ नका, संघटनात्मक ताकदीवरच…; आमदार रोहित पाटील यांचा निर्धार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
China-Taiwan: आशियात युद्धाचा भडका! चीनने तैवानला 6 युद्धनौकांनी घेरले; 18 विमानांची ‘रेड लाईन’मध्ये घुसखोरी, लष्कर हाय अलर्टवर

China-Taiwan: आशियात युद्धाचा भडका! चीनने तैवानला 6 युद्धनौकांनी घेरले; 18 विमानांची ‘रेड लाईन’मध्ये घुसखोरी, लष्कर हाय अलर्टवर

Jan 24, 2026 | 04:51 PM
खबरदार! अमेरिकेवर येणार भयानक संकट; Air India ने रद्द केली सर्व उड्डाणे, नेमके प्रकरण काय?

खबरदार! अमेरिकेवर येणार भयानक संकट; Air India ने रद्द केली सर्व उड्डाणे, नेमके प्रकरण काय?

Jan 24, 2026 | 04:49 PM
Tech Layoffs: टेन्शन वाढवणारी बातमी! ‘या’ कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांचा नोकऱ्या जाणार, टेक क्षेत्रात भीतीचे सावट

Tech Layoffs: टेन्शन वाढवणारी बातमी! ‘या’ कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांचा नोकऱ्या जाणार, टेक क्षेत्रात भीतीचे सावट

Jan 24, 2026 | 04:44 PM
Panvel Municipal Election 2026: पनवेलचे नेतृत्व आता विस्तारणार: विकसित वसाहतींमधील प्रतिनिधींना संधी देण्याची मागणी

Panvel Municipal Election 2026: पनवेलचे नेतृत्व आता विस्तारणार: विकसित वसाहतींमधील प्रतिनिधींना संधी देण्याची मागणी

Jan 24, 2026 | 04:44 PM
IND VS NZ 2nd T20l : ‘मी रोहित शर्माच्या पावलावर पाऊल…’, भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माचे मोठे विधान 

IND VS NZ 2nd T20l : ‘मी रोहित शर्माच्या पावलावर पाऊल…’, भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माचे मोठे विधान 

Jan 24, 2026 | 04:42 PM
Trump Penguin: अत्यंत हास्यास्पद! ‘आणि यांना ग्रीनलँड हवाय…’, व्हाईट हाऊसची ‘ती’ पोस्ट ठरली 2026 मधील सर्वात मोठे ट्रोलिंग

Trump Penguin: अत्यंत हास्यास्पद! ‘आणि यांना ग्रीनलँड हवाय…’, व्हाईट हाऊसची ‘ती’ पोस्ट ठरली 2026 मधील सर्वात मोठे ट्रोलिंग

Jan 24, 2026 | 04:30 PM
दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी स्पेशल अभियान! मोठ्या संख्येने विद्यार्थी देणार परीक्षा

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी स्पेशल अभियान! मोठ्या संख्येने विद्यार्थी देणार परीक्षा

Jan 24, 2026 | 04:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Jan 24, 2026 | 04:00 PM
Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Jan 24, 2026 | 03:51 PM
Ahilyanagar Drugs :  ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Ahilyanagar Drugs : ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Jan 24, 2026 | 03:42 PM
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Jan 24, 2026 | 03:38 PM
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

Jan 24, 2026 | 03:08 PM
MUMBAI : छगन भुजबळ निर्दोष; आता ईडीने प्रायश्चित्त घ्यावे -संजय राऊत

MUMBAI : छगन भुजबळ निर्दोष; आता ईडीने प्रायश्चित्त घ्यावे -संजय राऊत

Jan 24, 2026 | 03:05 PM
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.