Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईकरांचे पाणी आता अधिक शुद्ध होणार! जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढणार

आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र म्हणून प्रख्यात असलेल्या या संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 10, 2026 | 01:58 PM
मुंबईकरांचे पाणी आता अधिक शुद्ध होणार! जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढणार

मुंबईकरांचे पाणी आता अधिक शुद्ध होणार! जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढणार

Follow Us
Follow Us:

मुंबई शहर आणि उपनगराला पाणी पुरवठाकरण्यासाठी पिसे पांजरापूर येथील संकुलात असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने या संकुलात प्रतिदिन ९१० दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. याकरीता कंत्राटदार नेमण्यात आले असून, प्रकल्प सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.(फोटो सौजन्य – istock)

Mumbai News: रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्यांचा सुळसुळाट! पश्चिम रेल्वेची एप्रिलमध्ये २,६५७ प्रवाशांवर कारवाई

मुंबई शहर आणि उपनगर भागस स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी भातसा नदीच्या पाण्यावर पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र म्हणून प्रख्यात असलेल्या या संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. हा प्रकल्प तीन टप्प्यांत बांधण्यात आला आहे.

नवीन केंद्र बांधण्यास आणखी काही वर्षे लागू शकतात. त्यामुळे मुंबईकरांचा पाणीपुरवठा बाधित होऊ नये म्हणून पालिकेने याच संकुलात ९१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. हा नवीन प्रकल्प उभारल्यानंतर जुन्या प्रकल्पातील सर्वात जुना पहिला टप्पा बंद करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्यातील जलशुद्धीकरण केंद्र १९७९ मध्ये म्हणजेच ४६ वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. वर्षानुवर्षे क्लोरीनसारख्या रसायनांच्या सतत संपर्कात आल्यामुळे याच्या संरचनेची झीज झाली आहे. त्यामुळे या जलप्रक्रिया केंद्रावे आयुर्मान संपुष्टात आले आहे. या जलशुद्धीकरण प्रकल्पाची पुनर्बाधणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पाणीपुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या जलशुद्धीकरण प्रकल्पाची पुनर्बाधणी केली जाणार आहे.

वाळवण महोत्सव : पालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये या तारखेपासून रंगणार उन्हाळी फराळाची मेजवानी

पिसे पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पाची सव्याची एकूण क्षमता प्रतिदिन १३६५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची आहे. २१० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारल्यानंतर ही क्षमता १८२० दशलक्ष लिटरने वाढेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यानी व्यक्त केला. या कामासाठी नोव्हेंबर २०२५ मध्ये कंत्राटदार नेमण्यात आले असून आता या सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी कामाच्या प्रकल्प व्यवस्थापनासाठी १६८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The water of mumbaikars will be more pure now the capacity of the water purification project will increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Dam Water Level
  • Drinking Water
  • Mumabi

संबंधित बातम्या

Dizziness Causes: वारंवार चक्कर येतेय? दुर्लक्ष करू नका; असू शकतात ‘हे’ गंभीर आजार
1

Dizziness Causes: वारंवार चक्कर येतेय? दुर्लक्ष करू नका; असू शकतात ‘हे’ गंभीर आजार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.