मुंबई : पावसाळी अधिवेशनापूर्वी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान, काल रात्री (सोमवारी) उशिरा मंत्रीमंडळ विस्तार व खातीवाटप याबाबत शिंदे-फडणवीस-पवार यांच्यात तब्बल दिड तास बैठक चालली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते. अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटाला मंत्रिपद मिळणार की नाही, याबाबत सगळ्यानाच उत्सुकता आहे. तर काल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कलंकित अशी टिका केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टिका केली.
हळद पिवळी नाही तर काळी…
दरम्यान, कलंकित सरकारमध्ये फडणवीस हळद लावून बसले असल्याचे ते म्हणाले. पण ती हळद पिवळी नाही तर काळी असल्याची घणाघाती टीका राऊत यांनी केली. महाराष्ट्रातील सरकार कलंकित असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हे सरकार कलंकित असल्याचे आम्ही नाही तर, केंद्रीय तपास संस्था सांगत असल्याचे देखील ते म्हणाले. ३ कलंकित खाती खातेदारांसह सरकारमध्ये सामील झाले असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच संपूर्ण सरकारच कंलकित असल्याचं देखील राऊतांनी म्हटलं आहे.
…तर त्यांनी आधी टिळकांचे चरित्र वाचावे
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, मी पंतप्रधान आणि ज्या समितीने त्यांना पुरस्कार जाहिर केला, त्यांना लोकामान्य टीळकांचे चरित्र असलेले पुस्तक भेट म्हणून पाठवणार असल्याचे ते म्हणाले. पुरस्कार स्वीकारण्याआधी मोदींनी टीळकांचे चरित्र वाचायला हवे, अस देखील ते म्हणाले. या सरकारमधील मंत्र्यांकडे शिखर बँक घोटाळ्यातील पैसा, तेलगीचा पैसा असा भ्रष्ट्राचारातून कमावलेला पैसा असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
कधी होणार पुरस्कार सोहळा?
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भाजपासोबत गेलेल्या भ्रष्ट आमदारांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. तसंच, यावरून आता राज्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.