Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी; पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात बससेवांचा तुटवडा

पंढरपूर तालुक्यातील बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता बससेवा वाढविण्याची मागणी होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 20, 2025 | 02:33 PM
बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी; पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात बससेवांचा तुटवडा

बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी; पंढरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात बससेवांचा तुटवडा

Follow Us
Follow Us:

पंढरपूर : शाळा, महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यातच तालुक्यात विवाह सोहळ्याची धूम आहे. परिणामी, तालुक्यातील बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. विशेषतः पंढरपूर बसस्थानकावर गत दोन महिन्यांपासून गर्दी होत आहे. मात्र, दोन आठवड्यांपासून अनेक ग्रामीण भागात बसगाड्यांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता बससेवा वाढविण्याची मागणी होत आहे.

उन्हाळी सुट्यांमुळे विद्यार्थ्यांना गावी जाण्याची, तर नातेवाईक, मित्रमंडळींची विवाहकार्यासाठी जाण्यासाठी लगबग सुरु आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन व्यवस्थेवर ताण वाढला आहे. पंढरपूर बसस्थानकात दररोज सकाळपासूनच प्रवाशांची गर्दी होत आहे. अनेकदा नागरिकांना बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागत आहेे. बस न मिळाल्यास तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. बसेसच्या पुढे खासगी वाहने धावायची. परंतु, आता खासगी अवैध प्रवाशी वाहतूक बंद पडली आहे.

ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस दिवसभरात ठराविकच वेळा चालविल्या जातात. तुरळक बसफेऱ्यामुळे प्रवाशांना वेळेवर बस न मिळाल्यास दुसऱ्या फेरीसाठी अनेक तास थांबावे लागत आहे. प्रवाशांची संख्या वाढत आहे.

खासगी वाहनांकडे प्रवाशांची पाठ

चार वर्षांपूर्वी तालुक्यात अवैध प्रवाशी वाहतुकीचे लोण गाव-खेड्यापर्यंत पसरले होते. यातून अनेक बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हायच्या. परंतु, यामुळे बससेवा अडचणीत सापडली होती. परंतु प्रवासी वर्ग पुन्हा एसटीकडे वळला असून, खासगी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

वाढीव बसफेऱ्या शहरांपुरत्या

पंढरपूर आगारांमधून बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातच गर्दीमुळे होणारी गैरसोय थांबविण्यासाठी पंढरपूर विभागाने १ मेपासून अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. पंढरपूर बसस्थानकांवरून अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, बहुतेक बसेस शहरांपुरत्या मर्यादित असल्याने ग्रामीणांची गैरसोय होत आहे.

रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे

रिक्षाचालकांकडून वाजवीपेक्षा अधिक, अनेकदा मनमर्जीने भाडे घेतले जात असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसतो आहे. अशा स्थितीत राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महिलांसाठी ५० टक्के तिकिटात प्रवास सवलत, अमृत योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकही बसचा पर्याय स्वीकारत असल्याने गर्दीत वाढ झाली आहे.

Web Title: There is a shortage of bus services in the rural areas of pandharpur taluka which is causing congestion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 01:43 PM

Topics:  

  • Bus Stand
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • cmomaharashtra

संबंधित बातम्या

Sharad Pawar Drought Tour : शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार
1

Sharad Pawar Drought Tour : शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल
2

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी
3

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी

पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! ‘या’ तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर
4

पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! ‘या’ तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.