Photo Credit- Social Media 'हे नेते' ठरवणार देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मंत्री
कोल्हापूर: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी (15 डिसेंबर) होणार आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याबाबत अद्यापही सस्पेन्स आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात भाकित केलं आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह ज्यांची नावे देतील तेच नेते उद्या शपथ घेतली. अशी प्रतिक्रीया भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रसाद लाड यांनी कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे. शरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेत आहेत. भांडणं फक्त निवडणुकीपुरती मर्यादित असतात. त्यामुळे पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने केंद्रात आणि राज्यात आपली छाप उमटवली आहे, अशा ज्येष्ठ नेत्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आपला गुरु मानतात. त्यामुळे शरद पवार आणि अमित शांहांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. असंही आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.
Lal krishna Advani: लालकृष्ण अडवानी यांची प्रकृती खालावली, अपोलो रुग्णालयात दाखल
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी मोठ्या घराण्यातील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केल्याशिवाय त्यांचे अस्तित्त्व टिकू शकणार नाही, म्हणून त्या आरोप करत असतात. ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत पाच-सहा वेळा निर्णय झाला आहे. जवाहरलाल नेहरून यांनीदेखील तीन वेळा शपथ घेतली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा शपथ घेणारे नरेंद्र मोदी हेच आहेत.
दादरमधील 80 वर्षे जुने हनुमान मंदीर तोडण्याच्या नोटीसीबाबत विचारले असता. प्रसाद लाड म्हणाले, “एकही मंदीर तुटणार नाही. एकही हनुमान मंदिर पाडले जाणार नाही. हा हिंदूंना शब्द आहे. मशिदीच्या जुन्या स्ट्रक्चरला आमचा आक्षेप नाही, पण कोरोना काळात ज्यांनी मशिदींवर मजले चढवले त्याला आमचा आक्षेप आहे. आम्ही मशिदी पाडणार आणि मंदीरे वाचवणार ही आमची भूमिका आहे.”
नौदलात भरतीच्या आमिषाने फसवणूक; तब्बल १७ जणांना घातला गंडा
दरम्यान, आधी 14 डिसेंबरला मुंबईतील राजभवनावर शपथविधी होणार असल्याची माहिती होती. मुख्यमंत्री कार्यालयाने त्या संदर्भात राजभवनाला शपथविधीची तयारी करण्याचे पत्रही दिले होते. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीची तयारीही सुरू झाली होती. पण अचानेक शुक्रवारी नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शपथविधी नागपुरातील राजभवनावर घेण्याचा निर्णय़ घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना फोनवरून नागपुरातील राजभवनात शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची विनंती केली.
पण 14 तारखेचा शपथविधी 15 डिसेंबरला घेण्याचा निर्णय़ का घेण्यात आला, याबाबत माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेणाऱ्या ज्या मंत्र्यांची यादी तयार केली होती, तिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यस्तेमुळे मंजुरी मिळू शकली नाही. ती आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत मिळू शकते. त्यामुळे शपथविधीलाही उशीर झाल्याचे सांगितले जात आहे.