
नगर-कल्याण महामार्गावर तीन तास आंदोलन
हे आंदोलन सलग तीन तास सुरू होते. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दांत टीका करत थेट पारनेर तहसीलदारांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली. आंदोलनस्थळी ज्येष्ठ नेते कारभारी आहेर, शिवसेना नेते संदीप कपाळे, उद्योजक संदीप रोहकले, उपसरपंच माऊली वरखडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Ahilyanagar News: उंबरे परिसरात रिक्षा-मिनीबसचा अपघात! 3 जणांचा जागीच मृत्यू
पारनेर तालुक्यातील मांडओहळ परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व भरधाव वाहतुकीमुळे पुन्हा एकदा निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे. रविवारी सकाळी सुमारे सात वाजता मांडओहळ नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने बोकनकवाडी–वासुंदे रस्त्यावर दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात संतोष नन्हे (वय ३२, रा. बोकनकवाडी, ता. पारनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली.
आंदोलकांनी पारनेर तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. तहसील कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांशी अपमानास्पद वागणूक दिली जाते, अरेरावी भाषेचा वापर होतो, असा आरोप करत तहसीलदार जनतेवर माज दाखवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.
रस्ता रोको आंदोलनामुळे पारनेर ते साकूर मुख्य रस्त्यावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. अनेक वाहने रांगेत उभी राहिली. मात्र आंदोलकांनी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन केले. प्रशासनाला निवेदन देत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागण्या पाठविण्याची विनंती करण्यात आली. पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून मागण्या वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
’10 कर्मचारी भाजले अन् 6 जण…’; दौंडच्या हॉटेल जगदंबामध्ये नेमके घडले काय?
मांडओहळ परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध वाळू उत्खनन व भरधाव डंपर वाहतूक सुरू असून, त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. तरीही महसूल व पोलीस प्रशासन प्रभावी कारवाई करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत—