Ahilyanagar News: उंबरे परिसरात रिक्षा-मिनीबसचा अपघात! 3 जणांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ४.१५ वाजता नाशिक येथील काही तरुण तीनचाकी रिक्षामधून (MH 15 AJ 1133) शिंगणापूर येथे दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी शिंगणापूरहून राहुरीकडे येणारी खासगी ट्रॅव्हल्स मिनीबस (MH 04 LK 7254) उंबरे परिसरातील तांबे पेट्रोल पंपाजवळ आली. ऊसाच्या ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मिनीबसने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोराची धडक दिली.
PUNE NEWS : पुणे डाक विभागात डिजिटल पेमेंटचा वेग; तीन महिन्यांत ३.८८ कोटींचा महसूल
धडकेनंतर मिनीबस रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की रिक्षातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर आणि एक जण किरकोळ जखमी झाला. मिनीबस मधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उशिरापर्यंत जखमींची नावे समजू शकली नव्हती. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मिनीबस ऊसाच्या ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला. काही नागरिकांच्या मते, बसचा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाला असावा. पोलिसांकडून नोंद झाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
’10 कर्मचारी भाजले अन् 6 जण…’; दौंडच्या हॉटेल जगदंबामध्ये नेमके घडले काय?
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. राहुरी येथील भागवत वराळे, बाळासाहेब वराळ, प्रथमेश वराळे, आकाश लहांनगे, सचिन जाधव यांच्यासह रुग्णवाहिका चालकांनी जखमींना तात्काळ राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमींना नगर येथे हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन तरुणांना मृत घोषित केले. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.






