स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग! राज्यात १३ हजार सोनोग्राफी केंद्रांवर कडक तपासणी
राज्यात आजही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. बेकायदेशील गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्यांच्या घटनांना आळा बसला आहे, पण हे प्रकार थांबलेले नाहीत. एक किंवा त्याहून अधिक मुली असलेल्या महिलांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. गर्भधारणेनंतर प्रथम आरोग्य यंत्रणेच्या रेकॉर्डवर आल्यापासून तर त्यांची प्रसुती होईस्तोवर त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच सर्व जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठविले आहे.(फोटो सौजन्य – istock)
Amravati News : शेतकरी पुन्हा विळख्यात! जिल्ह्यात सावकारीचे वाढतेय ‘महाजाल’, तब्बल कोटींचं कर्जवाटप
राज्यात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे पोर्टेबल आणि अनियंत्रित अल्ट्रासाऊंड यंत्रे उपलब्ध होत आहेत. त्यांचा वापर लिंगनिदान करण्यासाठी होतो. त्यातून पुढे स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांही घडत आहेत. त्यामुळे सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची जिल्हा आणि महापालिकास्तरावरील अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले. केवळ नियमित तपासणीच नाही तर सर्वच व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त करतानाच दरमहा १० तारखेच्या आत जिल्हा आरोग्य अधिकारीनव्याने प्रशासनाने नियमित तपासणीच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळविणे अपेक्षित आहे. सध्या राज्यात सुमारे १३ हजार सोनोग्राफी केंद्र आहेत, तर ६ हजारांवर अधिकृत गर्भपात केंद्रे आहेत.
आरोग्य विभागाच्या मदतीने सर्व नोंदणीकृत सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची जिल्हा आणि महापालिकास्तरावरील अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी अपेक्षित आहे, असे सूत्रांनी सांगितले. केवळ नियमित तपासणीच नाही तर सर्वच व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त करतानाच दरमहा १० तारखेच्या आत जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी
संबंधित संस्थांकडून गर्भवती महिलांचा मासिक अहवाल प्राप्त करून तो सरकारला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य खाते आणि या खात्याचे मंत्री स्वतः लक्ष घालून यावर नियंत्रण ठेवणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रात अलिकडच्या काळात गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्यांच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसते आहे. राज्याच्या मागास भागांपेक्षा प्रगत भागांमध्ये हे प्रमाण अधिक दिसते.विशेषतः पुणे आणि कोल्हापूर विभागात अलिकडे काही प्रकरणे समोर आली आहेत. या मार्च महिन्यात कोल्हापूरच्या बिद्री येथे एका खासगी हॉस्पिटलवर छापा टाकून डॉक्टरसह ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
जंगलाच्या जिल्ह्यात बांबूचा तुटवडा! आदिवासी कारागीर हवालदिल; कच्च्या मालाअभावी पारंपरिक उद्योग ठप्प
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मोबाईल अॅपच्या मदतीने गर्भलिंग निदान करणान्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वाढवा, लेक घडवा मोहिम राबविली जात आहे. अवैधपणे कुणी गर्भलिंग निदान करीत असल्याची माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी लेक वाचवा, लेक आजही आपल्या समाजात मुलीऐवजी मुलगाच पाहिजे या अट्टाहासापोटी ग्रामीण भागात अनेक जण बेकायदेशीर मागांची अवलंब करीत असल्याचे समजते. या कामी डॉक्टर व एजंट्सचे मोठे जाळे आहे. त्यांना लॅब टेक्नेशियनसुद्धा मदत करीत अ असल्याचे समोर आले आहे.






