Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीबीमुक्त भारतासाठी ‘रील’चा फंडा; परिचारिका आणि विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी

टीबीविरोधी जनजागृती आता डिजिटल माध्यमातूनही केली जाणार आहे. महाराष्ट्रातील परिचारिका आणि परिचर्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय ‘रील’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यातून टीबीची लक्षणे आणि प्रतिबंधाबाबत जनजागृती केली जाणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 12, 2026 | 01:28 PM
टीबीमुक्त भारतासाठी ‘रील’चा फंडा; परिचारिका आणि विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी

टीबीमुक्त भारतासाठी ‘रील’चा फंडा; परिचारिका आणि विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी

Follow Us
Follow Us:
  • दीर्घकाळ खोकला, रात्री घाम आणि अशक्तपणा ही टीबीची लक्षणे असू शकतात.
  • वेळीच तपासणी आणि पूर्ण उपचार केल्यास टीबीवर मात करता येते.
  • परिचारिका ‘रील’मधून टीबीबाबत जनजागृती करणार आहेत.
एकेकाळी ‘देवीचा रोग कळवा, हजार रुपये मिळवा’ किंवा ‘पाणी गाळा, नारू टाळा’ अशा घोषवाक्यांमधून आरोग्य जनजागृती केली जायची. आता त्याच जनजागृतीने डिजिटल माध्यमांची वाट धरली असून, क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रातील परिचारिका आणि परिचर्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय ‘रील’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

परस्पर संमतीने अवघ्या 18 दिवसांत घटस्फोटाचा दावा मंजूर; 2020 मध्ये झालं होतं लग्न, पण नंतर…

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र शाखेच्या संयुक्त पुढाकाराने ही स्पर्धा होत आहे. परिचर्या विद्यालये, महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी तसेच सेवेत कार्यरत परिचारिका यात सहभागी होऊ शकतात. क्षयरोगाची लक्षणे, वेळेवर तपासणी, उपचार पूर्ण करण्याचे महत्त्व, उपचारात खंड न पाडणे, योग्य पोषण आणि टीबी रुग्णांबाबतचा सामाजिक कलंक दूर करणे, अशा विषयांवर रील तयार करता येणार आहेत. विशेष म्हणजे रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात असलेल्या परिचारिका आणि विद्यार्थ्यांकडून संदेश दिला जाणार असल्याने आरोग्यविषयक माहिती अधिक वास्तव आणि प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

मराठी भाषेतील रीलमध्ये स्थानिक बोली, संवाद, छोट्या नाटिका, ग्रामीण जीवनशैली आणि प्रत्यक्ष अनुभवांचा वापर करता येणार आहे. रील पाठविण्याची अंतिम मुदत १४ ऑगस्ट २०२६ असून, tnaimahabr@yahoo.co.in या ई-मेलवर रील पाठवावी. जास्तीत जास्त विद्यार्थी परिचारिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य सेवा (सुश्रुषा) उपसंचालक डॉ. निलिमा सोनावणे यांनी केले आहे.

टीबी म्हणजे काय?

टीबी (Tuberculosis) ज्याला मराठीत क्षयरोग असेही म्हटले जाते हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा प्रामुख्याने शरीरातील फुफ्फुसांवर परिणाम करतो पण शरीरातील इतर भाग जसे की मणका, मूत्रपिंडे किंवा मेंदू यांच्यावरही हा आजार पसरण्याचा धोका असतो. बऱ्याचदा टीबीची लक्षणे सुरुवातील शरीरात जाणवत नाहीत ज्यामुळे अनेक वर्षे लोकांना हे माहितीच नसते की त्यांना टीबी हा आजार झाला आहे. पूर्वी हा आजार फार गंभीर मानला जायचा पण आता त्यातून सुखरुप बाहेर पडता येऊ शकते. टीबीवर उपचार उपलब्ध आहेत पण वेळीच यावर उपाययोजना केल्यास आणि सुरुवातीलाच याची लक्षणे ओळखल्यास आजारावर सहज मात करता येऊ शकते.

Mumbai- Pune मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट! कनेक्टिंग लिंक 3 तासांसाठी राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

टीबीचे लक्षणे?

  • १५ दिवसांहून अधिक काळ सतत खोकला येणे. सुरुवातीला हा खोकला हलका असू शकतो पण नंतर याचा त्रास वाढू शकतो.
  • खोकल्यातून रक्त किंवा थुंकी बाहेर पडणे.
  • श्वास घेताना किंवा खोकताना छातीत वेदना होणे.
  • थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.
  • रात्री घाम येणे.
  • भूक कमी लागणे.
  • दम लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.
 

Web Title: Tuberculosis awareness reel competition for nurses and nursing students in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख
1

Perseid Meteor Shower 2026: आकाशात होणार उल्कांचा वर्षाव! तासाभरात दिसणार तब्बल १०० उल्का, जाणून घ्या तारीख

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित
2

रिक्षा, टॅक्सी आणि ॲप-कॅब चालकांसाठी मोठी बातमी! मराठीचे ज्ञान बंधनकारक अन्यथा…; नियमभंग केल्यास परवाना होणार निलंबित

Alibag News: तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार, तरी एसटी बस चिखलाने माखलेल्या; ‘नोटेड’ च्या पलीकडे कारवाई कधी? प्रवाशांचा संताप
3

Alibag News: तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार, तरी एसटी बस चिखलाने माखलेल्या; ‘नोटेड’ च्या पलीकडे कारवाई कधी? प्रवाशांचा संताप

Yavatmal News: महात्मा फुले चौक अखेर अतिक्रमणमुक्त! वाहतूक पोलिसांनी केली कारवाई; फुटपाथवरील दुकाने हटविली
4

Yavatmal News: महात्मा फुले चौक अखेर अतिक्रमणमुक्त! वाहतूक पोलिसांनी केली कारवाई; फुटपाथवरील दुकाने हटविली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.