Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe: आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई

Tukaram Mundhe: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील पाच खाद्यपदार्थ आउटलेट्सवर महाराष्ट्र FDAने कारवाई केली आहे. अन्नसुरक्षा, स्वच्छतेच्या नियमांतील त्रुटी तसेच परवान्याच्या अटींचे उल्लंघन आढळल्याने चार फूड लायसन्स आणि एका स्नॅक काउंटरचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट निलंबित करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2026 | 11:45 AM
आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई

आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • MCAच्या BKC परिसरात FDAचा दणका
  • पाच फूड आउटलेट्सचे परवाने निलंबित
  • MCAमधील 5 खाद्य आउटलेट्सवर FDAचा बडगा
Tukaram Mundhe: अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरूच आहे. अशातच आता FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेचा फटका आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या आउटलेट्सना बसला आहे. FDAने MCA परिसरातील पाच आउटलेट्सचे फूड लायसन्स आणि रजिस्ट्रेशन निलंबित केले आहे.

पाच आउटलेट्सवर FDAची कारवाई

FDAच्या अधिकाऱ्यांनी 20 ऑगस्ट 2026 रोजी MCAच्या BKC परिसरातील खाद्यपदार्थांच्या आउटलेट्सची तपासणी केली होती. या तपासणीत अन्नसुरक्षा, स्वच्छता तसेच खाद्य व्यवसायासाठी आवश्यक परवान्यांशी संबंधित अनेक त्रुटी निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. या तपासणीनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 ऑगस्ट 2026 रोजी संबंधित फूड लायसन्स आणि रजिस्ट्रेशन निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले. तसेच FDAने परमिट रूम, पॅव्हिलियन, मेडिटेरेनियन, ओरिएंटल स्विंग आणि क्लब अँड पेस्ट्री काउंटर या पाच आउटलेट्सवर कारवाई केली आहे.

FDA Action On Hotels: तुकाराम मुंढे जोमात हॉटेल मालक कोमात! FDAच्या कारवाईत मुंबईसह राज्यातील मोठ्या रेस्टॉरंट्सचे परवाने रद्द

परवाने MCAच्या नावावर, संचालन दुसऱ्या कंपनीकडून

तपासणीमध्ये समोर आलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खाद्य व्यवसायाच्या परवान्याचा प्रत्यक्ष वापर. MCAला अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अंतर्गत चार रेस्टॉरंट्ससाठी स्वतंत्र चार फूड लायसन्स देण्यात आले होते. याशिवाय एका स्नॅक काउंटरसाठी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जारी करण्यात आले होते. मात्र, FDAच्या तपासणीत संबंधित आउटलेट्सवरील खाद्य व्यवसायाचे प्रत्यक्ष संचालन दुसऱ्या कंपनीकडून केले जात असल्याचे आढळून आले. या कंपनीच्या नावावर संबंधित खाद्य व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याचेही तपासणीत निदर्शनास आले. त्यामुळे परवान्याच्या अटींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर MCAच्या नावावर असलेले चार फूड लायसन्स आणि एक रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.

स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांमध्येही त्रुटी

FDAची कारवाई केवळ परवान्यांमधील अनियमिततेपुरती मर्यादित राहिलेली नाही. तपासणीदरम्यान आउटलेट्समध्ये अन्नपदार्थ हाताळण्याची पद्धत, परिसरातील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेशी संबंधित विविध बाबींमध्येही त्रुटी आढळल्याचे सांगण्यात आले. FDAच्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा आणि मानके विनियम, 2011 मधील अनुसूची 4, भाग 2 अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या विविध अन्नसुरक्षा आणि स्वच्छताविषयक निकषांचे पालन होत नसल्याचे तपासणीमध्ये समोर आले.

प्रसिद्ध आस्थापनांवरही FDAची नजर

मुंबईसह महाराष्ट्रात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थांची दुकाने आणि इतर खाद्य व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांमध्ये नियमांचे पालन केले जाते की नाही, यावर FDAकडून लक्ष केंद्रित केले जात आहे. विशेषतः ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या अन्नपदार्थांच्या बाबतीत स्वच्छता आणि सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. MCAसारख्या प्रसिद्ध संस्थेच्या परिसरातील आउटलेट्सवर झालेल्या कारवाईमुळे FDAची तपासणी केवळ लहान व्यावसायिकांपुरती मर्यादित नसल्याचा संदेशही गेला आहे.

नियमांचे पालन केल्याशिवाय खाद्य व्यवसाय नाही

खाद्य व्यवसायाचा परवाना ज्या व्यक्ती किंवा संस्थेच्या नावावर जारी करण्यात आला आहे, त्याच परवान्याच्या अटींनुसार व्यवसाय चालवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अन्न तयार करणे, साठवणूक, हाताळणी आणि ग्राहकांना अन्न देताना निर्धारित स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या निकषांचे पालन करणे बंधनकारक आहे. MCAच्या परिसरातील पाच आउटलेट्सवरील कारवाईतून FDAने ‘परवाना आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही’ असा स्पष्ट संदेश खाद्य व्यवसाय क्षेत्राला दिला आहे.

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Web Title: Tukaram mundhe maharashtra fda action mca bkc five food outlets licenses suspended food safety hygiene violations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • FDA
  • maharashtra
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर…’, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावरून वाद पेटला; मराठी एकीकरण समितीने दिला थेट इशारा
1

‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर…’, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावरून वाद पेटला; मराठी एकीकरण समितीने दिला थेट इशारा

समुद्राच्या तळाशी दडलेला इतिहास उलगडणार! विजयदुर्ग, जंजिरासह देशातील ५ ठिकाणी पुरातत्व विभागाची शोधमोहीम
2

समुद्राच्या तळाशी दडलेला इतिहास उलगडणार! विजयदुर्ग, जंजिरासह देशातील ५ ठिकाणी पुरातत्व विभागाची शोधमोहीम

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
3

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
4

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.